क्राईम न्यूज

Navi Mumbai Fraud News : नवी मुंबईत ‘तोतया मनपा अधिकारी’ गजाआड; दीड लाखांचा दंड ठोठावण्याची धमकी देऊन खंडणी उकळायचा

Navi Mumbai Police arrested Fraud Officer : ‘संदीप तावडे उर्फ अमोल पिसके’ याच्यावर दोन गुन्हे दाखल; वाशी पोलिसांनी सापळा रचून 25 हजार घेताना केली अटक

नवी मुंबई :- नवी मुंबईमध्ये स्वतःला महापालिकेचा (मनपा) अधिकारी भासवून घराचे नूतनीकरण बेकायदा ठरवण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याला वाशी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. Navi Mumbai Fake Officer हा व्यक्ती दीड लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची धमकी देत ‘सेटलमेंट’च्या नावाखाली लाखो रुपये उकळत असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात यापूर्वीही दोन गुन्हे दाखल आहेत. Navi Mumbai Latest News

तोतया अधिकाऱ्याची कार्यपद्धती: संदीप तावडे उर्फ अमोल पिसके (Amol Piske) असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. तो नवी मुंबईत मनपा अधिकारी असल्याची थाप मारून दंडात्मक कारवाईची धमकी देत खंडणी उकळत होता. वाशी येथे सदनिका घेऊन तिचे नूतनीकरण करणाऱ्या डॉ. अमृत हंचारे यांच्याकडे तो गेला. त्यांनी सोसायटीची रीतसर परवानगी घेतली असतानाही, अमोल पिसकेने हे नूतनीकरण बेकायदा ठरवले आणि दीड लाख रुपये दंड ठोठावला जाईल, अशी धमकी दिली. Navi Mumbai Vashi Police Latest News

अटक कशी झाली?

1.. डॉ. अमृत हंचारे यांची वाशी विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांच्याशी ओळख असल्याने, त्यांनी घडलेला प्रकार येडवे यांच्या कानावर टाकला. 2. येडवे यांनी ती व्यक्ती मनपा अधिकारी नसून तोतया असल्याचे सांगत, त्याला एकही रुपया न देण्याचा आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. 3. येडवे आणि डॉ. हंचारे यांनी वाशी पोलीस ठाण्यात अमोल पिसके विरोधात तक्रार दाखल केली. 4. डॉ. अमृत हंचारे यांनी अमोल पिसके याच्याशी दंडाच्या रकमेबाबत बोलणी केली असता, त्याने ‘पंचवीस हजार द्या, मी निपटून घेतो’ असे सांगितले. ५. ही रक्कम घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी वाशीतील एका हॉटेलमध्ये भेटायचे ठरले. वाशी पोलिसांनी सापळा लावून 25 हजार रुपये स्वीकारताच अमोल पिसके याला ताब्यात घेतले. Navi Mumbai Latest Crime News

वाशी पोलीस ठाण्याचे Vashi Police Latest News वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी माहिती दिली की, संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याने काही दिवसांपूर्वी असेच एक लाख रुपयांची खंडणी घेतली होती. त्याच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.

विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा लोकांना थारा न देता संबंधित विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago