Navi Mumbai : नवी मुंबईतील डॉक्टरांनी यशस्वीपणे केली पहिली नॉन-सर्जिकल कार्डियाक प्रक्रिया
Navi Mumbai Apollo Hospital : हेल्थ चेकअप मध्ये छिद्र असल्याचे आढळून आले, त्यावर उपाय म्हणून अपोलो नवी मुंबईने पहिले एएसडी स्टेन्टिंग केले
नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स Navi Mumbai Apollo Hospital नवी मुंबईमध्ये ४६ वर्षे वयाच्या रुग्णावर सायनस वेनोसस ऍट्रिअल सेप्टल डिफेक्ट (एएसडी) स्टेन्टिंग करून त्यांचे प्राण वाचवले. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये अशाप्रकारची प्रक्रिया पहिल्यांदाच करण्यात आली आहे. जन्मजात हृदय विकारांवर उपचार करण्यात हे एक अतिशय महत्त्वाचे पुढचे पाऊल उचलून, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने गुंतागुंतीचे व गंभीर हृदय विकास असलेल्या रुग्णांना नवी आशा प्रदान केली. Navi Mumbai Beaking News
नियमित हेल्थ चेकअप करता आले आयुष्य बदलवून टाकणारे निदान-मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये राहणारे, ४६ वर्षांचे श्री सुनील यांच्या नियमित आरोग्य तपासणीमध्ये एक धक्कादायक बाब आढळून आली. ईजीसी सामान्य नव्हता त्यामुळे पुढील तपासण्या केल्या आणि लक्षात आले की त्यांच्यामध्ये पार्शियल अनोमल्स पल्मनरी वेनस कनेक्शन (पीएपीव्हीसी) सह मोठा सायनस वेनोसस ऍट्रिअल सेप्टल विकार होता आणि तो बरीच वर्षे लक्षातच आला नव्हता. सर्व एएसडी केसेसपैकी ५% मध्ये सायनस वेनोसस एएसडी आढळते. एकावेळी जन्मलेल्या दर १५०० पैकी फक्त एका मध्ये हा विकार असू शकतो. हे अनपेक्षित निदान करण्यात आल्याने श्री सुनील आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला, पण त्यामुळे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये प्रगत उपचारांचा मार्ग खुला झाला. Navi Mumbai Beaking News
श्री सुनील (रुग्ण) म्हणाले, “एप्रिलमध्ये नियमित हेल्थ चेकअप करून घेतली आणि त्यामध्ये माझे पुढचे अवघे आयुष्य बदलवून टाकणारी समस्या आढळून येईल अशी मी कधी कल्पना देखील केली नव्हती. तपासणीदरम्यान माझ्या हृदयामध्ये काही गडबड आहे असे जाणवले, त्यासाठी पुढील तपासण्या करून घेतल्या, तेव्हा लक्षात आले की माझ्या हृदयात छिद्र होते. एका डॉक्टरांनी विशेषज्ञ डॉ भूषण चव्हाण यांना दाखवण्याचा सल्ला दिला, डॉ भूषण यांनी मला एएसडी स्टेन्टिंग करून घेण्याचा सल्ला दिला. ते केल्यानंतर माझी तब्येत सुरळीतपणे बरी झाली, माझे सध्याचे आरोग्य त्यांचे नैपुण्य दर्शवणारे आहे. मी पूर्णपणे बरा झालो आहे, माझे काम पुन्हा करू लागलो आहे आणि कोणत्याही अडथळ्यांविना सर्वसामान्य आयुष्य जगत आहे.” Navi Mumbai Beaking News
कार्डियाक देखभालीमध्ये नवक्रांती घडवून आणणारे नाविन्यपूर्ण उपचार २९ जुलै रोजी श्री सुनील यांनी पेडियाट्रिक कार्डिओलॉजीचे सिनियर कन्सल्टन्ट डॉ भूषण चव्हाण यांच्या तज्ञ देखभालीखाली उपचार घेण्यास सुरुवात केली. हे मिनिमल इन्वेसिव तंत्र अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील अत्याधुनिक कॅथ लॅबमध्ये करण्यात आले, GORE-TEX पॅचने कव्हर करण्यात आलेल्या विशेष कस्टमाइज्ड ६९ सेमी लांब, १४ मिमी व्यासाचा स्टेन्ट बसवण्यात आला. हा प्रगत स्टेन्ट रक्ताचा प्रवाह हृदयाच्या उजव्या बाजूने डावीकडे पुन्हा वळवण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. या स्टेन्टमुळे प्राणवायूयुक्त आणि प्राणवायूरहित रक्त मिसळून धोकादायक स्थिती निर्माण होणे प्रभावीपणे टाळले जाते. या धोकादायक स्थितीमुळे शरीरात इतर बरीच गुंतागुंत होण्याचा, रुग्णाचा जीव जाण्याचा देखील धोका असतो. Navi Mumbai Beaking News
डॉ भूषण चव्हाण, सिनियर कन्सल्टन्ट, पेडियाट्रिक कार्डिओलॉजी, अपोलो हॉस्पिटल,नवी मुंबई म्हणाले,”सायनस वेनोसस एएसडीच्या रुग्णांसाठी ही एक खूप मोठी प्रक्रिया आहे, खासकरून ज्यांच्यावर पारंपरिक सर्जरी केली जाऊ शकत नाही अशा रुग्णांसाठी ही प्रक्रिया खूप उपयुक्त आहे. या केसमध्ये आम्हाला मिळालेले यश क्लिनिकल उत्कृष्टतेप्रती तसेच नाविन्यपूर्ण व कमी इन्वेसिव तंत्रांचा वापर करून रुग्णांना अधिक सुधारित परिणाम मिळवून देण्याप्रती आमची वचनबद्धता दर्शवते. प्रत्येक रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता उंचावतील असे जीवनरक्षक उपचार पुरवणे हा आमचा उद्देश आहे. प्रक्रियेनंतर लगेच रुग्णाला एक्स-ट्यूबेट करण्यात आले. हा रुग्ण फक्त दोन दिवसांत घरी जाऊ शकला. चार ते पाच दिवसात त्यांनी आपली नेहमीची कामे करणे सुरु केले, त्यांना फक्त एक साधे अँटीकोग्युलेशन औषध घ्यायचे आहे.” Navi Mumbai Beaking News