मुंबईठाणे
Trending

Navi Mumbai Fire News : नवी मुंबईतील रुग्णालयात आग, 21 रुग्णांना सुखरूप बाहेर काढले

Navi Mumbai Nerul Fire News : नेरुळच्या सुश्रुषा रुग्णालयाच्या तळघरात आग, एक तास बचावकार्य सुरू

नवी मुंबई :- नेरुळ येथील सुश्रुषा रुग्णालयाच्या तळघरात आज दुपारी अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू केले. Navi Mumbai Latest Crime News

रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या वेळी एकूण 21 रुग्ण दाखल होते. यापैकी 4 रुग्ण अतिदक्षता विभागात (ICU) होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी आणि वेगाने सर्व रुग्णांना बाहेर काढले. 20 रुग्णांना रुग्णालयाच्या दुसऱ्या शाखेत हलवण्यात आले असून, एका रुग्णाला वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व रुग्णांना ऑक्सिजन ॲम्ब्युलन्सने सुरक्षितपणे हलवण्यात आले.

प्रादेशिक अग्निशमन अधिकारी गजेंद्र सुविष्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11.58 वाजता आगीची माहिती मिळाली. तळघरात लागलेली आग पूर्णपणे विझवण्यासाठी सुमारे एक तास लागला. आगीमुळे तळघर पूर्णपणे जळाले असले, तरी धूर इतर मजल्यांपर्यंत पसरला होता. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा रुग्ण जखमी झाल्याची नोंद नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0