नवी मुंबई : कोंबिंग ऑपरेशनमध्ये तब्बल 12 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, 16 आफ्रिकन नागरिकाला अटक
Navi Mumbai Police Cabeing Operation : 16 आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली असून 73 आफ्रिकन नागरिकांना देश सोडून झाल्या बाबत नोटीस बजावण्यात आले आहे
नवी मुंबई :- नवी मुंबई पोलिसांनी आयुक्तालयाच्या Navi Mumbai Police हद्दीत गुरुवारी रात्री एकाच वेळी 25 संशयित ठिकाणी छापे टाकून (कोंबिंग) कारवाई केली. या कारवाईत 16 आफ्रिकन नागरिकाकडे तब्बल 11.86 कोटींचा अंमली पदार्थ साठा मिळून आला. Navi Mumbai Police Drug News या प्रकरणी 16 व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो मूळ आफ्रिका देशाचा नागरिक आहे. तसेच विसा संपलेल्या 73 आफ्रिकन नागरिकांना देश सोडून जाण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. Navi Mumbai Police Latest News
पोलीस आयुक्त मिलींद भारंबे Navi Mumbai CP Milind Bharambe यांनी राबविलेल्या अंमली पदार्थ मुक्त नवी मुंबई अभियाना अंतर्गत सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, उपायुक्त अमित काळे, विशेष शाखा उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले आर्थिक गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे गुन्हे शाखा कक्षाकडील तसेच तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी गुरुवारी रात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कोबिंग ऑपरेशनमध्ये संयुक्तीकरित्या एकाचवेळी 25 ठिकाणी कारवाई करून 16 विदेशी नागरिकांना ताब्यात घेतले होते. Navi Mumbai Police Latest News
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकुण 150 पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झालेले होते. त्यांनी आयुक्तालय हद्दीमध्ये एकुण 25 ठिकाणी छापा टाकुन 2 किलो 45 ग्रॅम वजनाचे कोकेन (किंमत अंदाजे 10 कोटी 22 लाख रूपये), 663 ग्रॅम एम.डी. पावडर (किंमत अंदाजे 1 कोटी 48 लाख रूपये), 58 ग्रॅम मिथिलीन (किंमत अंदाजे 11 लाख 60 हजार रूपये), 23 ग्रॅम चरस (किंमत अंदाजे 3 लाख 45 हजार रूपये), 31 ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे 6 हजार रूपये) असे सुमारे 11 कोटी 86 लाख रूपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत. कारवाईमध्ये 13 अफ्रिकन नागरिक व बनावट पासपोर्ट किंवा विसा बाळगणारे 3 अफ्रिकन नागरिक अश्या एकुण 16 अफ्रिकन नागरिकांना अटक केलेली आहे. तसेच कारवाई दरम्यान पासपोर्ट व विसा संपलेल्या 73 अफ्रिकन नागरिकांना देश सोडुन जाणेबाबतच्या नोटीस बजावली आहेत. Navi Mumbai Police Latest News