Navi Mumbai Drugs News : अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आफ्रिकन नागरिकाच्या मुसक्या आवळल्या, 1.02 कोटींचे कोकेन जप्त
Navi Police have detained an African citizen : नवी मुंबईत अंमली पदार्थ तस्करांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आफ्रिकेन नागरिकांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 1 कोटी 02 लाख रुपयांचे कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
नवी मुंबई :- नवी मुंबईत अवैधरित्या राहून अंमली पदार्थाचा व्यवसाय Navi Mumba Illegal Drug Sealing करणाऱ्या आफ्रिकन नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांच्या Navi Mumbai Police माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीत हात गुंतलेले आहे. त्याच्याकडून सुमारे 1 कोटी 2 लाख रुपयांचे कोकेन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 1 Crore Drug Seized In Navi Mumbai याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात एनडीपीसीएस कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. Navi Mumbai Police Latest News
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार,आर.एन. हाइट्स बिल्डींग, सेक्टर 25 ए, उलवे, नवी मुंबई येथे एका आफ्रिकन व्यक्तीने कोकेन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी बेकायदेशीर रित्या बाळगला आहे.”पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून छापा टाकला असता जार्न ओकान्टे डासिल्व्हा (Jeorge Ocante Dasilva) (वय 35, मुळ रा. गीनी देश) याने त्याचे घरातील बेडरूम मध्ये ठेवलेल्या मरून रंगाच्या बॅगमधुन एकुण 410 ग्रॅम वजनाचा 1 कोटी 2 लाख 50 हजार रूपये किंमतीचा “कोकेन” हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी बेकायदेशिररित्या ताब्यात ठेवलेला मिळुन आला आहे.पनवेल शहर पोलीस ठाणे Panvel Police Latest News येथे गुन्हा गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 21 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला 31 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास उलवे पोलीस ठाणे करीत आहे.आरोपीवर यापुर्वी नवघर पोलीस ठाणे, मुंबई शहर येथे NDPS ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल आहे. Navi Mumbai Police Latest News
पोलीस पथक
धर्मराज बनसोडे, सहायक पोलीस आयुक्त, अ.मा.वा.प्र.कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या मार्गदशनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद भरगुडे, पोलीस हवालदार धोनसेकर, पोलीस शिपाई ठाकुर, चव्हाण, पारासुर, कोलते, पाटील,हांडे हे सहभागी झाले होते. Navi Mumbai Police Latest News