Navi Mumbai Drug News : अंमली पदार्थाची विक्री करणारे तीन नायजेरियन अटकेत; 75 लाख 68 हजार रुपये किंमतीचे एमडी आणि कोकेन जप्त
Navi Mumbai Police Arrested Three Nigerians in custody For Selling Drugs : कोकेन आणि एमडी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तीन नायजेरियन नागरिकांना अटक ; पोलिसांनी 302 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे
नवी मुंबई :– कोपरखैरणे Koparkhairne Drug Racket भागात एमडी (मेफेड्रॉन) आणि कोकेन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या तीन नायजेरियन Three Nigerians in custody नागरिकांना कोपरखैरणे पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सिल्वासा नाचोर,(42 वर्ष) इझिके डोनाटस ओबुगुआ,(40 वर्ष), संडे इहझीओबी,(42 वर्ष) नावे असून त्यांच्याकडून तब्बल 75 लाख 68 हजार रुपये किंमतीचे 302 ग्रॅम वजनाचे कोकेन आणि एमडी अंमली MD Drug Seized पदार्थ जप्त करण्यात आले आहे. Navi Mumbai Latest Crime News
कोपरखैरणे येथील पोशिरदेवी म्हात्रे कुलदैवत मंदीराजवळच्या गल्लीमध्ये नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना Koparkhairne Police Station मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षकांत नायडू, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस हवालदार गणेश पवार, विजय पाटील, ज्ञानेश्वर बनकर, संजय फुलकर, अंकुश म्हात्रे, अनंत सोनकुळे यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी त्या भागात संशयास्पदरित्या तीन नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. Navi Mumbai Latest Crime News
पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता, याच्याजवळ 101 ग्रॅम वजनाचा 25 लाख 38 हजार रुपये किंमतीचा मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला. तर 201 ग्रॅम वजनाचा कोकेन 50 लाख 30 हजार रुपये किंमतीचा हा अंमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तिघांकडे सापडलेले तब्बल 75 लाख 98 हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करून तीन नायजेरियन नागरिकांना एनडीपीएस अधिनियम 1985 चे 8(क),21 (ब),22 (क),29 कलमाखाली अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे अमली पदार्थ विरोधी पक्षाचे गुन्हे शाखा, नवी मुंबई हे करत आहे. Navi Mumbai Latest Crime News
पोलीस पथक
मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांनी नशामुक्त, नवी मुंबई अभियान सुरू, केले असुन त्या अनुषंगाने मा संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांनी अंमली पदार्थाची तस्करी करणारे, खरेदी विक्री करणोर तसेच सेवन करणाऱ्या विरुध्द प्रभावी व परिणामक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.