Navi Mumbai police Arrested Nigerian Man With 27 Lakh Drugs : नायजेरियन कडून 27 लाख रुपयांचा मेफेड्रॉन आणि दारू साठा जप्त केला आहे.
नवी मुंबई :- नवी मुंबई पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने Navi Mumbai Anti Narcotics Squad कारवाई करत 20 नायजेरियन आरोपींसह 27 लाख रुपयाचे मेफेड्रॉन आणि दारू साठा जप्त करण्यात आला आहे. Nigerian Man With 27 Lakh Drugs तसेच नायजेरियन व्यक्तींना भाड्याने दिलेल्या रूम मालकावरही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात Kharghar Police Station महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई, सहपरदेशी नागरिक कायदा 1946 चे कलम 14 (अ) (क) आणि रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स ऍक्ट 1939 चे कलम पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सात आरोपींवर दारूबंदी अंतर्गत कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला तर 13 आरोपींच्या विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. Navi Mumbai Police Latest News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विरोधी कक्षाचे संदीप निगडे यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली होती की, खारघर पोलीस ठाण्याच्या आधी लेमन किचन आणि जेमिनी किचन या दोन नायजेरियन हॉटेल्स मध्ये दारूच्या पार्ट्या आणि ड्रग्ज पार्टी चालू असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करत पुणे शाखेचे दीडशे महिला आणि पोलीस कर्मचारी दंगल पथक नियंत्रण आणि फॉरेन्सिक टीम या पथकाने दोन्ही ख्रिश्चन वर छापा टाकला असता पोलिसांना वीस नायजेरियन व्यक्ती या पार्टी सहभागी झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून 26 लाख 77,500 किमतीचे 107 ग्रॅम वजनाच्या मेफेड्रॉन 22,490 किंमतीचे दारू साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी वीस आरोपींच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांच्यावर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Navi Mumbai Police Latest News
अटक आरोपींची नावे
बुनबाना अन्नीताह, नकाच्वा शेरीनाह,नकाझीब्वे रेहेमा, नसाझी फीओनाह,डियाको ऐशटोन,व्हिक्टोरी जेम्स,ओनयेका उसुनुआ,चुक्कू ओकोव्जी,ॲमडेंचुक्यु ओनियेरीसारा, उचो इझो, इझेसी एनोम्दी, इकेचुक्वु एल्गबोट,ईकेचिकओ पॉल, ओनोएजिसी ओबम, विलीयन मॅथ्यु, ॲचिनिके,ओनेबोची ओझोईन,ओगोह प्रिन्स,फिलीप ओकोयो,गीवा केम यांना अटक करण्यात आलेली आहे. Navi Mumbai Police Latest News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, अमित काळे यांनी नवी मुंबई,भाऊसाहेब ढोले, सहायक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलानी, पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील आणि 150 पोलिसांनी कारवाई करत वीस नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…