Navi Mumbai Drug News : अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या माय-लेकाला नवी मुंबई पोलिसांनी ठोकल्या

Navi Mumbai Police Seized Drugs From Peddler: 21 किलो 740 ग्रॅम गांजा,170 ग्रॅम एम डी,20 लिटर गावठी हातभटटीची दारु,देशी व विदेशी दारूच्या बाटल्या असा एकुण खालील 38 लाख 79 हजार 135 रूपय किंमतीचा मुददेमाल जप्त
नवी मुंबई :– नवी मुंबई पोलिसांनी माय-लेकाला अंमली पदार्थ, गावठी दारू, विदेशी दारू बेकायदेशीर विक्री प्रकरणी बेड्या ठोकल्या आहे. Navi Mumbai Police 21 किलो 740 ग्रॅम गांजा,170 ग्रॅम एम डी,20 लिटर गावठी हातभटटीची दारु,देशी व विदेशी दारूच्या बाटल्या असा एकुण खालील 38 लाख 79 हजार 135 रूपय किंमतीचा मुददेमाल नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-1 जप्त केला आहे. Navi Mumbai Crime Branch Unit 1
“नशा मुक्त नवी मुंबई” या अभियानाचे अनुषंगाने मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त, संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अमित काळे, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) यांनी नवी मुंबई अंमली पदार्थ मुक्त करण्याचे व त्याचा व्यापार, सेवन अथवा विक्री करणा-या इसमांविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
14 मार्च रोजी कक्ष-01, गुन्हे शाखा, नवी मुंबई कार्यालयाकडील पोलीस नाईक रविंद्र सानप यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळाली की, ईश्वर नगर, पांडे चाळ जवळ, रूम नंबर 01, दिघा, नवी मुंबई येथे एक महिला व तीचा मुलगा असे गांजा, एम.डी. पावडर तसेच देशी व विदेशी दारू यांचा बेकायदेशीर साठा करून जीवन बबन ढाकणे याचे मार्फतीने रूममधुन अंमली पदार्थ व दारूची बेकायदेशीर विक्री करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी यांनी त्यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे दिनांक 14 मार्च रोजी कारवाई करून आरोपी जीवन बबन ढाकणे, (वय 27, रा. सिडको चाळ, संजीवनी शाळेसमोर, ईश्वर नगर, दिघा, नवी मुंबई) यास ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याचे ताब्यातील रूममधून “21 किलो 740 ग्रॅम वजनाचा गांजा, 170 ग्रॅम वजनाची एम.डी. (मेफेड्रॉन) असा अंमली पदार्थ, 20 लिटर गावठी हातभटटीची दारु” तसेच देशी व विदेशी दारूच्या बाटल्या असा एकुण खालील 38 लाख 79 हजार 135 रू. किंमतीचा मुददेमाल मिळून आला आहे. आरोपीच्या विरोधात रबाले एमआयडीसी पोलीस ठाणेएन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (C), 20(B), (ii), 22(C) सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम चे कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयातील पाहीजे आरोपी व अमंली पदार्थ हा कोठून आणण्यात आला याचा शोध घेण्यात येत असून, गुन्हयाचा पुढील तपास रबाले एमआयडीसी पोलीस ठाणे Rabale MIDC Police Station करत आहे. आरोपीला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.