क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Navi Mumbai Drug News : नवी मुंबई एपीएमसी परिसरात 2.80 लाखांचा ‘एमडी’ जप्त; एका युवकाला अटक

Navi Mumbai Latest Drug News : तुर्भे येथे गस्ती पोलिसांची कामगिरी; उच्चभ्रू ग्राहकांसाठी अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा संशय

नवी मुंबई :- नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाणे Navi Mumbai APMC Police Staion हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एका 25 वर्षीय युवकाला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून तब्बल 2 लाख 80 हजार किमतीचा ‘एमडी’ (MD) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव रमजान इमाम शेख (वय 25, रा. तुर्भे, इंदिरानगर) असे आहे. Navi Mumbai Crime News

नेमकी घटना काय?

दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अंमली पदार्थ टास्क फोर्सचे गस्ती पथक एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी तुर्भे सेक्टर 19, पाम बीचजवळ असलेल्या महापारेशन कार्यालयासमोर रमजान शेख संशयास्पद हालचाली करताना आढळला. पोलिसांनी त्याला हटकले असता, तो घाबरला आणि उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. Navi Mumbai Latest Crime News

संशयास्पद बोलणे आणि हालचालींमुळे पोलिसांनी त्याला एपीएमसी पोलीस ठाण्यात आणले आणि त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे पांढऱ्या रंगाची भुकटी आढळून आली, जी तपासणीनंतर ‘एमडी’ हा अंमली पदार्थ असल्याचे समोर आले. Navi Mumbai Drug News

जप्त केलेला मुद्देमाल

रमजान शेख याच्याकडे 28 ग्रॅम वजनाचा, 2 लाख 80 हजार किमतीचा ‘एमडी’ अंमली पदार्थ, 4,000 किंमतीचा मोबाईल आणि 5,710 रोख रक्कम असा एकूण 2 लाख 89 हजार 710 किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा नोंद करून त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

एमडी तस्करीचा एपीएमसी कनेक्शन

रमजान शेख ज्या भागात पकडला गेला, तो एपीएमसी मार्केट (आशियातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती) म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी राज्य तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठी वर्दळ असते. यामुळे या परिसरात अंमली पदार्थ आणि गुटख्यासारख्या प्रतिबंधित वस्तूंची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

विशेष म्हणजे, ‘एमडी’ हा अंमली पदार्थ उच्चभ्रू लोकांची पसंती असल्याने, एपीएमसी परिसरात असलेले बेकायदा हुक्का पार्लर आणि पबसारख्या ठिकाणी अशा पदार्थांना ग्राहक मिळत असल्याचा पोलिसांचा अनेकदा संशय असतो. गुरुवारी केलेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या या संशयाला अधिक पुष्टी मिळाली आहे. रमजानने हा अंमली पदार्थ कोठून आणला आणि कोणाला विकणार होता, याची सखोल चौकशी पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0