Navi Mumbai Dance Bar : नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी आणि डान्सबार मालकांनी नियम बसविले धाब्यावर..
Navi Mumbai Dance Bar Latest News : डान्सबार विरोधात कारवाई करिता पोलिसांची हाताची घडी तोंडावर बोट…
नवी मुंबई :- नवी मुंबई पोलिसांच्या (Navi Mumbai Police) हद्दीत जवळपास 80 हून अधिक डान्सबार आहे. या डान्स बार (Dance Bar) वर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. सर्रास रातोरात करोडो लाखोचे आर्थिक व्यवहार या डान्सबारमध्ये होत असतात. अशा बारमालकांवर पोलिसांची कोणतीही कारवाई नाही कोणताही आळा नाही. पोलीस डान्सबार कारवाईवर कानाडोळा करतात तर डान्सबार मालक नियम धाब्यावर बसून पोलिसांना हाताशी धरून सर्रास डान्सबार जोरदार रातभर चालवितात. महाराष्ट्र मिरर (Maharashtra Mirror) वृत्तसंस्थेने 31 डिसेंबरला नवी मुंबईत डान्स बार मध्ये झालेला कल्ला याचा पोलखोल केला होता. पोलिसांनी डान्सबार मालकाची चैन कशाप्रकारे काम करते याचा खुलासा महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेने केला होता. नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ एक आणि परिमंडळ दोन यांचा बार मालकांवर असलेला वरदहस्त आणि त्यांची चैन आर्थिक लागेबंध असे सर्व प्रकरण आम्ही जनतेसमोर मांडले होते. परंतु यातून पोलिसांनीही कोणत्याही प्रकारे बोध न घेता केवळ हाताची घडी तोंडावर बोट हे प्रकार झाल्याचे दिसत आहे. Navi Mumbai Dance Bar Latest News
नवी मुंबई ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली चालवलेल्या डान्सबार आणि त्यांचे मालकांच्या असलेले पोलिसांचे कनेक्शन यांचा खुलासा
ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्या बारचे महाराष्ट्र मिररने केलेले स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये प्रामुख्याने बारमालकांचे नावे पुढे आले आहे. विष्णुनाथ देवडीगा उर्फ विष्णू अण्णा, बाला अण्णा यांचे नवी मुंबई पोलीस उप आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्याशी असलेले धागेदोरे आर्थिक देवाणघेवाण या लाळसापोटी सर्रास डान्सबारच्या नावाखाली शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवून धांगडधिंगाणा चालू आहे. लोकांचे आयुष्यभर चे कमाई एका रात्रीत या डान्सबार मध्ये लुटली जाते. आणि कुटुंब रस्त्यावर येत आहे संसार उध्वस्त होत आहे याचा प्रशासनाला काही घेणे-देणे नाही. संसारामध्ये मानसिक तणाव निर्माण होऊन संसार विभक्त होत आहे कुटुंबाचा नाश होत आहे अशा परिस्थितीतही प्रशासनही शांत आहे. महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेने मागील केलेल्या स्टिंग ऑपरेशन नुसार या डान्स बार मध्ये आणि ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली चालवलेल्या बारमध्ये मोठ्या प्रमाणावर बारडान्सर बेकायदेशीर रित्या नृत्य करत असल्याचे पोलिसांच्या आम्ही निदर्शनास आणले आहे. काँगो, क्रेझी बॉय ,साई पॅलेस बिंदास, साई निधी चांदनी, नटराज, गोल्डन नाईट, नाईट रायडर, मून नाईट, आयकॉन, ग्रेट्स, कपल डिंपल, इंटरनेट, कॅप्टन, व्ही व्ही आय पी, बिग बॉस, नाईट एंजल, नाईट सिटी, स्टार नाईट,बेबो, आयकॉन, कॅबाना, वाईट हाऊस,लव्ह, सोना, क्रेझी स्टार, स्टार गोल्ड, राजा महाल, सावली, सेल्फी, नटराज, संडे, मधुबन, कपिल किनारा, मेट्रो, दिलरुबा, रमेश, हेवन सिक्स, सेंटर पॉईंट, शंपून, एम एच 43, एसबी नाईट, सेंटर पॉईंट, ब्लू स्टार, रसना, आदर्श, बेला.. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ एक आणि परिमंडळ दोन हे सर्व डान्सबार चालत आहे.आता तरी पोलीस यावर कारवाई करणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. प्रशासन आता काय कारवाई करणार? ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्या बालकांच्या आणि डान्सबार मध्ये अतिरिक्त बार डान्सर नाचवणाऱ्या बेकायदेशीर रित्या कृत्य करणाऱ्या बारमालकांचा पोलीस मुसक्या आवळणार का? त्यांच्यावर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच, महाराष्ट्र मिरर यांनी केलेले स्टिंग ऑपरेशन उघडकिस आणू..
क्रमशः..