नवी मुंबई, दि. ११ जून,
टीम महाराष्ट्र मिरर : Navi Mumbai Dance Bar Special
नवी मुंबईत बारबालांची छमछम ‘झिंगाट’ सुरु असून पोलीस प्रशासन ‘अर्थ’ पूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर येत आहे. एकीकडे राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री आदेश देत असताना त्यांच्या आदेशाला नवी मुंबई पोलिसांकडून केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचा प्रकार समोर येत आहे. (Navi Mumbai Dance Bar)
पुण्याच्या घटनेनंतरही नवी मुंबईत डान्सबारचा (Navi Mumbai Dance Bar) जोर कायम, अनधिकृत डान्सबार, पब पोलिसांच्या ‘अर्थ’ पूर्ण दुर्लक्षपणामुळे खुलेआम जोरात सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र मिरर कडून केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या बातमीनुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 1, परिमंडळ 2,हद्दीतील डान्सबार मध्ये खुलेआम छम छम चालू असल्याची खात्रीदायक माहिती समोर आली होती. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत डान्सबारचे प्रमाण सातत्याने वाढत चालल्याचे दिसून येत आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालू असल्याची खात्रीदायक माहिती समोर आली आहे. अनेक ऑर्केस्ट्रा बार वर पोलिसांकडून कारवाईचे सत्र चालू असूनही सर्रास बारमालक पोलिसांना बगल घालत शासनाच्या नियमाला पायदळी तुडवत पहाटेपर्यंत डान्सबार चालू ठेवत आहेत. या डान्सबार मालकांना राजकीय पाठबळ आहे का? की कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हे डान्सबार चालवले जातात का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. 31 डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागताकरिता देशभरात जल्लोष साजरे करत असताना नवी मुंबईत डान्सबारमध्ये लाखो आणि कोट्यावधी रुपयाचे उलाढाल झाली होती. प्रशासनाचे या गोष्टीकडे लक्ष आहे का?
नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तालयाच्या परिमंडळ 1 आणि परिमंडळ 2 च्या हद्दीत काही डान्सबार सर्रासपणे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालवत आहे. परिमंडळ 2 च्या हद्दीतील सर्व डान्सबारचे कनेक्शन विष्णू अण्णा हा करून देतो अशी माहिती सध्या समोर आली आहे. तसेच त्याचा साथीदार बाला आण्णा हा परिमंडळ एक च्या हद्दीतील डान्सबारचे कनेक्शन करतो. यांच्यावर कारवाई होणार का? पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे का ?
नवी मुंबईत पोलीस आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानंतर गेल्या तीन-चार महिन्यात ऑर्केस्ट्रा बार वर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. पनवेल मधील क्रेझी बॉईज रेस्टॉरंट अँड बार 26 ऑगस्ट 2023 मध्ये कारवाई करण्यात आली असून या रेस्टॉरंट अँड बार यांनी नियमाचे उल्लंघन केल्यामुळे 30 ऑगस्ट 2023 रोजी ह्या बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातील नटराज बार ॲण्ड रेस्टॉरंट यांच्यावर 19 ऑक्टोंबर 2023 रोजी कारवाई करण्यात आली होती. तसेच 5 जानेवारी 2024 रोजी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल नटराज रेस्टॉरंट यांचा परवाना पोलिसांनी रद्द केलाय या दोन्ही बारवर ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार चालवण्याचे काम बारकांकडून होत आहे. आता पोलीस प्रशासन परिमंडळ 1 आणि 2 हद्दीतील डान्सबार वर कारवाई करणार का? विष्णू अण्णा आणि बाला आण्णा नियमाचे उल्लंघन करून सर्रास डान्स बार चालवणाऱ्या बारमालकांवर कारवाई होणार का? हे पाहणे आवश्यक राहील.
नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ एक आणि दोन या संपूर्ण पोलिसांच्या हद्दीत जवळपास 30 हून अधिक डान्सबार सध्या ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार चालवतात आहे. हे डान्सबार स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून जोरदार रात्रंदिवस डान्सबार चालवतात महाराष्ट्र मिरर ने केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये असे दिसून आले की विश्वनाथ देवडीगा उर्फ विष्णू अण्णा हा परिमंडळ 2 हद्दीतील सर्व डान्सबारचे कनेक्शन करून स्थानिक प्रशासनाला मलिदा पाठवतो तर बाला अण्णा परिमंडळ एकच्या हद्दीतील सर्व डान्सबार चे कनेक्शन मलिदा पार्सल करतो. अनेक वेळा डान्सबार मालकांना सांगून प्रशासनाकडून धाडी घातल्या जात असतात. डान्सबार मालकांना बारवर धाड पडण्याच्या पूर्वसूचना प्रशासनाकडून दिली जाते. प्रशासन ज्यावेळी बारवर धाड टाकण्यासाठी येतो त्यावेळी बारच्या वॉचमन कडून एक विशेष बटन दाबून बारमधील लाईट बदलण्याचा इशारा करून खतरा असल्याचे सूचना देत असतो. तसेच शासनाने दिलेल्या नियम अटी घालून एका बारमध्ये कमीत कमी चार ते पाच महिला बारडान्सर असणे आवश्यक आहे.परंतु हे बारमालक नियमाचे उल्लंघन करून जवळपास 25 ते 30 महिला बारडान्सर या डान्स बार मध्ये असतात. ज्यावेळी पोलिसांनी डान्सबार मध्ये किती महिला आहे हे पाहण्यासाठी येत असतात त्यावेळी वाचमेन कडून एक विशेष बटन दाबून बार मालकांना सूचना दिली जाते. अशावेळी उर्वरित सर्व डान्सबार महिलांना बारमध्ये एका विशिष्ट रूमची व्यवस्था केली जाते ती रूम केवळ तेथे काम करणाऱ्या कामगारांना बारमालकांनाच माहीत असते. साधारण अशा रूम हे किचनच्या किंवा वॉशरूमच्या परिसरात एका छुप्या पद्धतीने तयार केले असतात. दररोज बारची पाहणी करण्याकरिता येत असतात अशा वेळेस या महिलांन त्या रूममध्ये लपून ठेवले जाते. त्या रूममध्ये जवळपास 20 ते 25 महिला लपवू शकतात अशी जागा केली असते. अशा गोष्टीने हे डान्सबार मालक पोलिसांची दिशाभूल करत आहेत. प्रशासनाला पाहिजे रक्कम देऊन प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सरकारचे सर्व नियम बाजूला सारून सर्रास डान्सबार पहाटेपर्यंत चालवत असतात.
नवी मुंबईतील ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चाललेल्या डान्सबार यांची नावे पुढील बातमीत सविस्तर क्रमश:
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…