मुंबई

Navi Mumbai Crime News : दुबईत नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; सिराज इद्रीस चौधरीला वाशी पोलिसांकडून अटक

•कामाच्या ठिकाणी व इतरत्र जबरदस्तीने बलात्कार; आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

नवी मुंबई :- दुबईमध्ये उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेला फसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीस वाशी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सिराज इद्रीस चौधरी (55 वय), मुंबईचा रहिवासी असून, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पीडित महिलेवर आरोपीने तिच्या कामाच्या ठिकाणी तसेच इतर ठिकाणी जबरदस्तीने बलात्कार केला. दुबईतील नोकरीचं आमिष दाखवून आरोपीने तिला विश्वासात घेतलं आणि नंतर तिच्यासोबत वारंवार अत्याचार केले.

महिलेने अखेर वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिराज चौधरी याच्यावर याआधीही गुन्हे दाखल असून, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago