Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; 20 लाख किंमतीचे हेरॉईन जप्त
•घरातून चालला होता अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय, एका महिलासह तिघांना अटक, नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई
नवी मुंबई :- नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या एका महिलेसह तिघांना अटक केली असून 20 लाख रुपये किंमतीचे 100 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे, तसेच हे अंमली पदार्थ ग्राहकांना तुर्भे येथील आपल्या घरातून विक्री करत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस हवालदार गणेश पवार यांना एका गुप्त माहितीच्या आधारे, तुर्भे येथील प्रेम नगर नवजीवन शाळा परिसरात असलेल्या एका भागातील एका फ्लॅटवर छापा टाकला, जिथे त्यांनी इक्थारुल इर्शाद शेख (25 वर्ष) आणि सत्तारूल इर्शाद शेख (22 वर्ष) या दोन भावांना अटक केली. चौकशीदरम्यान, आरोपींनी खुलासा केला की त्यांनी हे ड्रग्ज फिरोजाबी हसिम शेख (38 वर्ष) यांच्याकडून आणले होते, ज्याला नंतर पोलिसांनी शोधून अटक केली. पोलिसांनी या महिलेच्या ताब्यातून वीस लाख रुपये किंमतीचे हिरॉईन अंमली पदार्थ जप्त केला आहे. तिन्ही आरोपींच्या विरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 21 (क), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वसीम शेख, तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे, नवी मुंबई हे करीत आहेत.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, नवी मुबंई मिलींद भारंबे यांनी नशामुक्त नवी मुंबई अभियान सुरु केले असून त्या अनुषंगाने पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, अमित काळे यांनी अंमली पदार्थांची तस्करी करणारे, खरेदी-विक्री तसेच सेवन करणा-या विरुध्द प्रभावी व परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.भाऊसाहेब ढोले, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडु, पोलीस हवालदार रमेश तायडे, उत्तम लोंखडे, गणेश पवार, महिला पोलीस शिपाई योगिता शेळके,अर्चना पाटील, पोलीस शिपाई अंनत सोनकुळ, या पथकाने ठिकाणी छापा टाकला असता महिलेला अटक करण्यात आली आहे.