नवी मुंबई, दि. १६ जून, मुबारक जिनेरी
महाराष्ट्र मिरर
Navi Mumbai Crime News | स्पा चालकांना खोट्या गुन्ह्यात गुंतविण्याची धमकी देत तब्बल ४४ लाख खंडणी उकळणाऱ्या पिता पुत्रावर सानपाडा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी याच खंडणीखोर पिता पुत्रावर ठाणे आयुक्तालयातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात व पुण्यातील बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुणे, मुंबई, नवी मुंबईसह ठाण्यात स्पा चालकांकडून खंडणी उकळणाऱ्या चौधरी पिता पुत्रावर मोक्का कायद्यान्वये कारवाई होण्याची शक्यता आहे. Spa Extortions
याबाबत अधिक माहिती अशी कि, Sanpada Police Station, सानपाडा पोलीस हद्दीतील एका महिला संचालित स्पा सेंटरवर खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून महिन्याकाठी ५० हजार रुपयांची व एकूण अंदाजे ४४ लाख रुपये खंडणी वसीम चौधरी व सिराज चौधरी यांनी मागितली होती. याबाबत स्पा चालक महिलेने तक्रार नोंदविल्यावरून सानपाडा पोलिसांनी गुरंन १८३/२०२५, बीएनएस ३०८ (६), ३ (५) अन्वये आरोपी सिराज अहमद इद्रिस चौधरी व वसीम अहमद सिराज चौधरी, रा. दोघे टागोर नगर, विक्रोळी, मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल केला.
खंडणीखोर आणि बोगस पत्रकार..
बाणेर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी दाखल गुन्ह्यात चौधरी पिता पुत्राचे बिंग फुटले होते. कायदेशीर परवानग्या घेत उदरनिर्वाहासाठी स्पा व्यवसाय चालविणाऱ्या अनेक स्पा चालकांना चौधरी याने पत्रकार असल्याचे भासविले होते. तसेच खोट्या गुन्ह्यात गुंतविण्याची धमकी देत खंडणी वसुलीचा धंदा मांडला होता.
सानपाडा पोलिसांनी चौधरीची कुंडलीच तपासली..
नवी मुंबईतील अनेक स्पा चालकांना वेठीस धरणाऱ्या चौधरी पिता पुत्राचे कारनामे पोलिसांसमोर येत होते. अशातच सानपाडा येथील स्पा चालक महिलेला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत महिना ५० हजार रुपये खंडणी चौधरी पिता पुत्राने मागितल्याची तक्रार प्राप्त झाली. सानपाडा पोलिसांनी सिराज चौधरी व वसीम चौधरी यांच्या कुंडल्या तपासून त्यांना कायदा दाखवून दिला.
स्पा चालकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
सिराज चौधरी व वसीम चौधरी यांच्यावर कारवाई झाल्याने अनेक स्पा चालकांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे. नवी मुंबईतच नव्हे तर पुणे, पिंपरी, ठाणे व मुंबईत देखील खंडणीचं साम्राज्य मोडकीस निघणार आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…