•विशेष पथक स्थापन होऊन आठवडाही उलटला नाही, तेवढ्यात पोलीस ठाण्याच्या शेजारीच चोरीची घटना
नवी मुंबई | नवी मुंबईतील वाढत्या चोरीच्या घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक भर पडली आहे. वाशी पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही फुटांवर, वर्दळीच्या ठिकाणी उभी असलेली कार फोडून पाच लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरांनी लंपास केली. या घटनेने पोलिस यंत्रणेच्या सुरक्षा योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. वकील व्यवसायिक शुभेन्दू पटनाईक यांनी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन समोर आपली कार पार्क केली होती. काही वेळाने दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी गाडीच्या मागील काचेवर दगड मारून ती फोडली व कारमधील 5 लाखांची रोकड घेऊन क्षणार्धात पसार झाले.
नवी मुंबईत अशा प्रकारच्या चोऱ्यांमध्ये अलीकडे मोठी वाढ झाली आहे. भुरट्या चोरांपासून सराईत टोळ्यांपर्यंत सर्व प्रकारचे चोर सक्रिय झाल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी काही दिवसांपूर्वीच विशेष पथकाची स्थापना केली होती. मात्र, त्या पथकाची प्रभावी अंमलबजावणी अद्याप दिसून आलेली नाही, हे या घटनेतून स्पष्ट होते.
या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…