Navi Mumbai Crime News : खारघर मध्ये बी एम ज्वेलर्सवर दरोडा, हवेत गोळीबार करणाऱ्या चार आरोपींना अटक
नवी मुंबई पोलिसांची कामगिरी ज्वेलर्स दुकानावर दरोडा आणि गोळीबार करणाऱ्या चार आरोपींना अटक दोन बंदूक आणि जिवंत काडतुसे जप्त, आरोपींना उदयपूर राजस्थान येथून अटक
नवी मुंबई :- खारघर सेक्टर 35 मधील बी एम ज्वेलर्सवर 29 जुलै 2024 रोजी रात्री सुमारास चार बंदूकधारी चोरट्यांनी दरोडा टाकला. या घटनेवेळी पळ काढताना या चोरट्यांनी हवेत गोळीबार केला.ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. परंतु पोलिसांनी चार आरोपींना उदयपूर राजस्थान येथून अटक केली आहे. त्यांच्याजवळून दोन बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. यांच्याविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात बी एम ज्वेलर्स चे मालक यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 311,109,309(4),(6) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. चारही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता 22 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा अजय कुमार लांडगे यांच्यासह मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे कक्ष-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांनी घटनास्थळी पाहणी करून पोलिसांनी आरोपीने आलेल्या मार्गावरून जवळपास आठ दिवस सीसीटीव्हीचे पाहणी केली त्यानंतर तांत्रिक तपासणी द्वारे गुन्ह्यातील चार आरोपी असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. आरोपी सुरत, गुजरात,उदयपूर राजस्थान व रायगड जिल्ह्यातील नेरळ माथेरान या ठिकाणी राहत असल्याचे पोलिसांना खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलिसांचे वेगवेगळे पथके तयार करून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तुंगेनवार, पोलीस उपनिरीक्षक आकाश पाटील, पोलीस हवालदार सचिन धनवटे,विश्वनाथ पांचाळ, पोलीस नाईक सचिन टिके, निलेश किंद्रे, सुधीर पाटील यांचे पथकाने उदयपुर, राजस्थान येथुन चार आरोपींना मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 2 बंदूक , 3 जीवंत काडतुसे, गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल व गुन्हयात चोरीस गेलेली सोन्याचे दागिने हे नागपाडा मुंबई येथुन हस्तगत करण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
1) मो. रिझवान मो. अलीशेख (27 वर्ष) (रा. सुरत, राज्य गुजरात)
2) अझरुद्दीन हुसनोदीन शेख (28 वर्ष) (रा. सुरत, राज्य गुजरात)
3) ताहा तनवीर परवेझ सिंधी (21 वर्ष) (रा.उदयपुर, राजस्थान)
4 ) राजविर रामेश्वर कुमावत (20 वर्ष) (रा. उदयपुर, राजस्थान)
अटक आरोपी अझरुद्दीन हुसनोदीन शेख याचेवर चार वेगवेगळे गुन्हे दाखल आहे तर मो. रिझवान मो. अलीशेख याचेवर दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.
पोलीस पथक
सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाल मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा कक्ष- 3 हनीफ मुलाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज गोरे, पोलीस उपनिरीक्षक देवकते, राहुल भदाने, सहाय्यक फौजदार मंगेश वाट, पोलीस हवालदार अनिल यादव, राजेश मोरे, दुधाळ,सांवत, जोशी, तांदळे, पोलीस नाईक सतिष चव्हाण, अशोक पाईकराव, इंटरसेप्शनचे पोलीस हवालदार तांडेल, पोलीस शिपाई ढगे व सीसीटीव्ही कमांड सेंटरच्या पोलीस हवालदार मंगल गायकवाड नवी मुंबई यांनी केली आहे. गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी कक्ष 3, गुन्हे शाखा, नवी मुंबई हे करीत आहेत.