•Magic Moment Spa Busted In Navi Mumbai : थायलंड, नेपाळसह सहा राज्यांतील महिलांना 6 हजार रुपयांच्या मोबदल्यात जबरदस्तीने वेश्याव्यवसायास भाग पाडत होते
नवी मुंबई :- राज्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या कठोर निर्देशानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सीबीडी बेलापूर सेक्टर 15 येथील “मॅजिक मोमेंट वेलनेस स्पा” या मसाज पार्लरवर छापा टाकून एका वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 15 महिलांची सुटका केली असून, रॅकेटचा मास्टरमाइंड असलेला स्पा मालक आणि त्याचा सफाई कर्मचारी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, मॅजिक मोमेंट वेलनेस स्पामध्ये महिलांना 6 हजार रुपयांच्या मोबदल्यात जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून स्पामध्ये पाठवला. या ग्राहकाने माहिती दिल्यानंतर शनिवारी सायंकाळी पोलिसांनी स्पामध्ये धाड टाकली.
देश-विदेशातील महिलांची सुटका
या धाडीत पोलिसांना स्पामध्ये एकूण 15 महिला आढळून आल्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीत स्पा सेंटरचा मालक आणि सफाई कामगार हे महिलांना मसाजच्या नावाखाली आणून त्यांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडत असल्याचे उघड झाले.
सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये दोन महिला थायलंडमधील, एक नेपाळमधील तर इतर भारतभरातील आहेत. यामध्ये दिल्ली (2), उत्तर प्रदेश (2), पश्चिम बंगाल (1), गुजरात (1) आणि महाराष्ट्रातील (6) महिलांचा समावेश आहे.
याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सीबीडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…