क्राईम न्यूज

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत ‘देह व्यापाराचा’ पर्दाफाश! गुप्त मिशनवर गेलेल्या ‘बनावट ग्राहका’मुळे 2 महिलांची सुटका; हॉटेल मॅनेजरसह 3 अटकेत!

Navi Mumbai Latest Crime News : 5000 रुपयांच्या ‘सौदा’ प्रकरणाने खळबळ; आरोपींना पोलीस कोठडी!

नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तालयाच्या परिसरात अवैध धंदे आणि अनैतिक मानवी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेने एक मोठी मोहीम यशस्वी केली आहे. एपीएमसी परिसरातील श्रीनिधी हॉटेल ॲण्ड लॉजिंग (प्लॉट नंबर 45, सेक्टर 19/सी) येथे खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे (AHTU) वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळाली. Navi Mumbai Latest Crime News

मिळालेल्या माहितीनुसार, लॉजचा मॅनेजर महिलांना वेश्यागमनासाठी बोलावून ग्राहकांना दाखवत असे आणि एका रात्रीसाठी तब्बल 5000 रुपये आकारले जात होते.

‘बनावट ग्राहक’ बनून पोलीस पथकाचा धाडसी छापा

बातमीची खात्री होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत गोपनीयता बाळगत एका ‘बनावट ग्राहकाला’ लॉजिंगमध्ये पाठवले. बनावट ग्राहकाने मॅनेजरकडून महिलेची निवड करून त्याला मोबदला (4,500 रुपये) दिला. ठरलेल्या सांकेतिक इशाऱ्यानंतर पथकाने हॉटेलमध्ये धडक छापा टाकला. या छाप्यावेळी लॉजमध्ये वेश्यागमनासाठी ठेवलेल्या दोन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली. Navi Mumbai Sex Racket News

लॉज मॅनेजरसह महिला पुरवठादार जाळ्यात

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तीन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये लॉजचा मॅनेजर मस्तराम रामस्नेही कनोजिया (वय 29), वेटर विशाल अवद यादव आणि महिला पुरवणारा मुख्य सूत्रधार सोनु उर्फ शाहिन हुसेन मंडल यांचा समावेश आहे. लॉज मालक रघु अण्णा (पाहिजे आरोपी) याच्यासह या सर्व आरोपींनी संगनमत करून महिलांना देह व्यापाराच्या दलदलीत ढकलल्याचे उघड झाले आहे.

या तिन्ही आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोर्टाने त्यांना 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एपीएमसी पोलीस या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पुढील तपास करत आहेत.

vivek

Recent Posts