मुंबई

Navi Mumbai Crime News : ‘ऑनलाइन’ वेश्याव्यवसायाचे रॅकेट उद्ध्वस्त : तीन फरार आरोपींना पश्चिम बंगालमधून जेरबंद!

•नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; तुर्भे येथील हॉटेलवर धाड टाकून 5 पीडित मुलींची सुटका

नवी मुंबई :- ऑनलाइन साईट्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या आंतरराज्यीय वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या तीन मुख्य आरोपींना पश्चिम बंगालमधील मालदा येथून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध धंद्यांवर वचक बसवण्याच्या पोलीस आयुक्तालयाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने मालदामधून पकडले दलाल; रॅकेटच्या मुळाशी जाण्यासाठी तपास सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे आणि अपर आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे यांच्या आदेशानुसार अनैतिक व्यापार आणि अवैध धंद्यांवर कारवाई तीव्र करण्यात आली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून 8 जुलै 2025 रोजी रात्रीच्या सुमारास तुर्भे येथील हॉटेल गोल्डन ओक वर बनावट ग्राहकाच्या मदतीने धाड टाकण्यात आली. या कारवाईत पाच पीडित मुलींची सुटका करण्यात आली. घटनास्थळावरून राजेशकुमार मुन्ना यादव (ऑनलाइन साईट चालवणारा), दिनेश शिवचरण डांगी (दलाल) आणि मुकेश कुमार आकलु राय (रिक्षाचालक) यांना अटक करण्यात आली होती.

याच गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि महिलांना वेश्याव्यवसायासाठी आणणारे तीन पाहिजे असलेले आरोपी – शंभू मुनीलाल उपाध्याय (दलाल), बॉबी उर्फ मकबूल बिलाल अन्सारी (दलाल) आणि धीरू (दलाल) – गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. गुन्हे शाखेचे पथक त्यांचा कसून शोध घेत होते. गोपनीय आणि तांत्रिक तपासाद्वारे हे आरोपी मालदा, पश्चिम बंगाल येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, 22 जुलै 2025 रोजी वरिष्ठांच्या परवानगीने AHTU पथक मालदा येथे रवाना झाले. अथक प्रयत्नांनंतर पथकाने तिन्ही फरारी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना 24 जुलै 2025 रोजी तुर्भे पोलीस ठाण्यात हजर करून अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शंभू मुनीलाल उपाध्याय (वय 32, मूळ रा. जयवनपूर, उत्तर प्रदेश), मकबूल बिलाल अन्सारी उर्फ बॉबी (वय 43, मूळ रा. चत्रा, झारखंड) आणि धीरेंद्र तिलकचंद आर्य (वय 26, मूळ रा. सतना, मध्य प्रदेश) अशी आहेत. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 28 जुलै 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुर्भे पोलीस ठाणे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.

या कारवाईमध्ये सहायक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे (AHTU, गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पोलीस हवालदार मांडोळे आणि पोलीस शिपाई पारासुर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

44 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago