Navi Mumbai Latest Crime News : एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त
नवी मुंबई :- अवैध पिस्तूल घेऊन Illegal Weapon User फिरणाऱ्या एकाला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-1 Navi Mumbai Unit 1 यांनी अटक केली आहे. Navi Mumbai Police ताब्यात घेतलेला व्यक्ती कामोठे सेक्टर-12 येथे राहणारा असून शस्त्र विक्रीसाठी तो आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. Navi Mumbai Latest Crime News
गुन्हे शाखा कक्ष-1 वाशी, नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली होती की, तुर्भे येथील ओवरब्रिज खाली परिसरात एकजण पिस्तूल घेऊन येणार आहे . गुन्हे शाखा कक्ष-1 यांचे एक पथक तयार करून सापळा रचून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. नितीन अशोक कांबळे (34 वय व्यवसाय बांधकाम कामगार, रा.सेक्टर-12, कामोठे, नवी मुंबई ) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडे देशी बनावटीची पिस्टल,02 जिवंत काडतुसे मिळुन आल्याने त्याचेविरूध्द तुर्भे पोलीस ठाणे, येथे हत्यार कायदा 1959 चे कलम 3,25 सह म. पो. कायदा 1951 चे कलम 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा, कक्ष-1वाशी, नवी मुंबई करत आहे. Navi Mumbai Latest Crime News
पोलीस पथक
मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त, संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई,सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कक्ष-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आबासाहेब पाटील, पोलीस उप निरीक्षक, सचिन बाराते, पोलीस उप निरीक्षक, प्रशांत कुंभार, पोलीस हवालदार आतिष कदम, निलेश पांचाळ, विश्वास भोईर यांनी केली आहे. Navi Mumbai Latest Crime News