मुंबई

Navi Mumbai Crime News : नवी मुंबई पोलिसांचे मोठी कारवाई : अवजड वाहनांची चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

ट्रक, हायवा, ट्रेलर अशा वाहनांची भारतातील विविध राज्यातुन चोरी करून त्यांची अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, मनिपुर, नागालैंड या राज्यात नोंदणी करून व महाराष्ट्रात हस्तांतरण करणेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे एन.ओ.सी. प्राप्त करून महाराष्ट्रातील विविध जिल्हयात पुर्ननोंदणी करून विक्री करणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलीसांकडुन अटक

नवी मुंबई :- आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी केले पर्दाफाश केला असून टोळी विविध राज्यातून मोठमोठे ट्रक्स चोरी करून इतर राज्यातून महाराष्ट्रात आणून बनावट चेसी नंबर व कागदपत्राच्या आधारे अवजड वाहनांची विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.ए.पी.एम.सी. पोलीस ठाणे हदि‌तील सेक्टर 19 बी, 19 सी परिसरात, एपीएमसी मार्केट, वाशी नवी मुंबई येथे कांही वाहने परराज्यातुन चोरी करून त्यांची महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून, विक्री करून मुळ मालकांची, विमा कंपन्याची फसवणुक केली जात असल्याची गुप्त माहीती मिळाली. पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, दिपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई अजयकुमार लांडगे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीची शहानिशा करून त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली असून एपीएमसी पोलीस स्टेशन भादवी कलम 420,465,467,468,471,413,201,401,120 (ब) अन्वये दिनांक 07 मार्च 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून गुन्ह्याचा उलघाडा

गुन्हयात आंतरराज्य टोळीचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्यामुळे गुन्हयाचा सखोल तपास करणेकरिता अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचे आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चादेकर, पोलीस उप निरीक्षक संजय रेडडी, पोलीस उप निरीक्षक प्रताप देसाई व पोलीस अमंलदार असे विशेष तपास पथकाची स्थापना केली होती.

पोलीस पथक यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हयातील मुख्य आरोपी जावेद अब्दुला शेख उर्फ मणीयार, किराडापुर, जि. छत्रपती संभाजीनगर यास अटक करण्यात आली. गुन्हयातील मुख्य सुत्रधार अटक आरोपी जावेद अब्दुला शेख उर्फ मनियार याने देशभरातील विविध राज्यातुन चोरी करून त्याचे चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांकात फेरबदल करून, वाहन निमिर्ती करणाऱ्या कंपनीप्रमाणे ॲल्युमिनियमच्या इंजिन नंबर प्लेट बनवुन घेतल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. तसेच त्याचे आणखीन काही साथीदारांचे मदतीने गाडीवरील मुळ चेसीस नंबर खोडुन नविन दुसरा चेसिस नंबरटाकुन सदरच्या गाड्या हया नागपुर, अमरावती व इतर आर.टी.ओ. कार्यालयात पुर्ननोंदणी केल्या आहेत. सदरबाबत नागपुर येथील आर.टी.ओ. एजंट यास अटक करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी जावेद अब्दुला शेख उर्फ मणीयार याने स्वतःचे 02 पॅनकार्ड बनविले असुन त्याने त्याच साथीदार याचे वेगवेगळया पत्यांचे आधारकार्ड तयार करून काही वाहनांची आर.टी.ओ. मध्ये पुर्ननोंदणी केली आहे. तसेच एकच मोबाईल नंबर वापरून इतर वाहन मालकांचे नावाची आर.टी.ओ. मध्ये नोंदणी करून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुख्य आरोपी जावेद अब्दुला शेख उर्फ मणीयार याचेसह त्यास सदर गुन्हयात सहकार्य करणारे 5 आरोपींना नागपुर, अमरावती धुळे, बुलढाणा, सुरत, औरंगाबाद येथे शोध घेवुन सदर गुन्हयात अटक केली आहे. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती येथील एक सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, एक मोटार वाहन निरीक्षक व एक सहायक वाहन निरीक्षक यांनी चुकीच्या पध्दतीने आरोपीतांशी संगनमत करून वाहने समक्ष हजर नसताना पुर्ननोंदणीची कार्यवाही केली. तसेच गुन्हयातील वाहने त्यांचेसमक्ष नमुद गाडयांची अंतिम मान्यता दिली व सदरच्या आर.टी.ओ. वाहन पोर्टलमध्ये सदर वाहनांची माहिती अपलोड झाली आहे. सदर गुन्हयातील हस्तगत करणाऱ्या वाहनांचे सध्याचे मालक यांनी आर.टी. ओ. पोर्टलवरून सदरची माहिती बघुन त्यावर विश्वास ठेवुन सदरची वाहने आरोपींकडुन हस्ते / परहस्ते खरेदी केली. यावरून त्यांचा देखील गुन्हयातील सहभाग दिसुन येत असल्यामुळे नमुद तीनही अधिकारी यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आले आहे.

दहा आरोपींना अटक

अटक आरोपी जावेद मनियार यांचे विरूध्द अशा प्रकारे नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर, औरंगाबाद आयुक्तालय व धुळे येथे चोरी व फसवणुकीचे एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. तसेच अटक आरोपी रफीक मंसुरी, (रा. अमरावती) यांचेवर 03 गुन्हे दाखल आहेत. अदयापपर्यंत एकुण 9 आरोपींना अटक करण्यात आला असुन एकुण 5 कोटी 50 लाख 23 हजार अंदाजे किमतीची 29 वाहने व मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्हयाचा मुख्य सुत्रधार जावेद अब्दुल्ला शेख याचा उत्तरप्रदेश व हरियाणा राज्यात चार गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हयाचा पुढील तपास मोटार वाहन चोरी शोध कक्ष, गुन्हे शाखा येथे चालु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0