Navi Mumbai Crime News : गुटखा विक्रेत्याच्या आवळल्या मुसक्या ; कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर गुटखासाठा जप्त
Navi Mumbai Anti Narcotics Crime Branch Arrested Gutkha Smuggler : नवी मुंबई,कळंबोली पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई ; गुटखा, पानमसाला, तंबाखु मोठ्या प्रमाणात साठा व विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या आवळल्या मुसक्या, आरोपीला केले जेरबंद
नवी मुंबई :- राज्यात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या (Mumbai Lok Sabha Phase 5 ) तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे पोलीस यंत्रणेकडून खबरदारी म्हणून बेकायदेशीर आणि अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उभारला आहे. नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) ही अवैधरित्या दारू, अंमली पदार्थ, रोख रक्कम, तंबाखूजन्य पदार्थ यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. (Navi Mumbai Anti Narcotics Branch) नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, पोलीस अपर आयुक्त गुन्हे, अमित काळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा यांनी नवी मुंबई नशा मुक्त करण्याचे व अंमली पदार्थ सेवन, गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू सेवन यांच्यावर प्रतिबंध असलेल्या तंबाखूजन्य पदार्थ यांची तस्करी खरेदी विक्री करणाऱ्या विरोधात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. Navi Mumbai Crime News
सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, आर्थिक गुन्हे शाखा नवी मुंबई यांना कळंबोलीच्या स्टील मार्केटमध्ये अत्ताउल्ला शेठ यांच्या गोडाऊनमध्ये महाराष्ट्र मध्ये प्रतिबंधक असलेला गुटखा पानमसाला सुगंधी तंबाखू हे विक्रीसाठी जवळ बाळगण्याची गोपडीय माहिती मिळाली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बनकर उत्तम लोखंडे गणेश पवार संजय फुलकर यांनी अत्ताउल्ला शेठ यांच्या कळंबोली येथे असलेल्या गोडावून वर छापे टाकले असता त्यांना 4 लाख 81 हजार 504 किमतीचा गुटखा विक्री करण्यासाठी आणला होता. कळंबोली पोलिसांनी (Navi Mumbai Police ) आरोपीच्या विरोधात 328,272,273,188,34 सह अन्नसुरक्षा मानके 2006 चे कलम 26,27 (2) ई,59 अन्वय गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली असून पुढील तीन आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. Navi Mumbai Anti Narcotics Crime Branch Arrested Gutkha Smuggler