Navi Mumbai Crime News : चोरी, घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; पोलिसांनी 9 गुन्हे उघडकीस
•चोरी, घरफोडी करणाऱ्या विकास दिलीप कांबळे (33 वय) व निसार अली नजरअली शहा (वय 35) या दोन सराईत चोरांना नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबई आणि पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 9 गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले
नवी मुंबई :- नवी मुंबई, पुणे, आणि मुंबई येथे दुकानाचे शटर तोडून, चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगारांना मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई कडून अटक करण्यात आली आहे. विकास दिलीप कांबळे (33 वय,रा. पवार वस्ती कुदळवाडी चिखली पिंपरी पुणे) आणि निसार अली नजरअली शहा (35 वय, रा. भवानी पेठ, पुणे मु रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून आरोपीकडून पोलिसांनी नवी मुंबई आणि पुणे आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेला यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात नोव्हेंबर च्या दरम्यान भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ),331(3),331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्याकडून सात दिवसाच्या समांतर तपासात करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास करून आरोपींची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली बद्दल ते कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी त्यांचे कक्षाकडील तपास पथके तयार करून पनवेल रेल्वे स्टेशन जवळील झोपडपट्टी येथे सापळा रचुन गुन्हयातील आरोपींना गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेवुन 30 नोव्हेंबरला अटक केली. त्यांना न्यायालयाने 7 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली. तपासामध्ये घरफोडी चोरीचे 08 व मोटार सायकल चोरीचा 1 असे एकुण 9 गुन्हे घडकिस आणले आहेत.
पोलीस पथक
मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निलम पवार, पोलीस उपनिरीक्षक राहूल भदाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश वाट, पोलीस हवालदार शशिकांत शेंडगे, अनिल यादव, संजय राणे, महेश पाटील, पोलीस नाईक सचिन टिके, पोलीस नाईक निलेश किंद्रे, राहूल वाघ, अजय कदम, सतिश चव्हाण, नितिन परोडवाड , महिला पोलीस शिपाई पुजा वैदय यांनी केली आहे.