क्राईम न्यूजमुंबई
Trending

Navi Mumbai Crime News : कालंबोलीत मिर्ची हॉटेलजवळ बेकायदा जुगाराचा अड्डा बिनधास्त सुरू!

Navi Mumbai Police Latest News : पोलिस प्रशासनाकडून दुर्लक्ष? कठोर कारवाईची मागणी जोर धरते

नवी मुंबई,कालंबोली :- कालंबोली परिसरातील मिर्ची हॉटेलजवळ एक बेकायदा जुगार अड्डा निर्भीडपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या अड्ड्याला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या कथित पाठबळामुळे संरक्षण लाभत असल्याचे बोलले जात आहे. Navi Mumbai Latest News

या जुगार अड्ड्यामुळे परिसरातील तरुण वर्ग वेगाने जुगाराच्या विळख्यात अडकत असून, अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे. अशा प्रकारचा अड्डा उघडपणे आणि कोणत्याही भीतीविना चालू असणे म्हणजे प्रशासनाचे अपयश असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

स्थानीय तरुणांचे भवितव्य धोक्यात; कुटुंबीय उद्ध्वस्ततेच्या उंबरठ्यावर

स्थानिक नागरिकांनी या प्रकाराकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आता नागरिकांनी जोरदार आवाज उठवत तात्काळ कारवाईची मागणी केली असून, संबंधित अड्ड्यावर कारवाई होऊन दोषींवर कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस विभागावर दबाव वाढत असून, येत्या काही दिवसांत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0