
- Navi Mumbai Crime News नवी मुंबई पोलीस आयुक्त लक्ष देतील काय ?
नवी मुंबई, दि. 15 जून, मुबारक जिनेरी : महाराष्ट्र मिरर
नवी मुंबईत अवैध धंदे जोमात सुरू आहेत. अवैध धंद्याचे गड समजल्या जाणाऱ्या सतरा प्लाझा येथे बाबूभाईला शह देत ‘अण्णा’ कडून कब्जा घेतला गेल्याची चर्चा जोरात आहे. याकडे नवी मुंबई पोलीस बघ्याची भूमिका घेत असून अवैध धंद्याकडे ‘अर्थ’ पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. Navi Mumbai Crime News

सतरा प्लाझा Satra plaza Navi Mumbai येथील कुप्रसिद्ध क्लब बाबूभाई चालवित होता. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे परिसरात या क्लबची चर्चा झाली होती. बाबूभाईचा क्लब ‘रडार’ वर आल्याने पोलीसांनी त्याचा पत्ता ‘कट’ केला होता. यानंतर क्लब मधून जमा होणारी ‘माया’ दर्शन देत नसल्याने सगळ्यांना दुष्काळ पडला होता. याचाच फायदा घेत ‘अण्णा’ कंपनीकडून वसूली गँग सोबत साटेलोट करून सतरा प्लाझावर कब्जा घेण्यात आला.
सतरा प्लाझा येथे शुक्रवार, शनिवार, रविवार धडाक्यात अवैध धंदे चालविले जातात याकडे पोलीस प्रशासन दूर्लक्ष करीत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असणारे नवी मुंबई पोलीस याकडे मात्र दूर्लक्ष करीत आहेत. शिस्तीसाठी कटिबद्ध असणारे पोलीस आयुक्त याकडे लक्ष देतील अशी आशा नागरिक बाळगून आहेत.
क्रमशः