क्राईम न्यूज

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या! 3 अट्टल गुन्हेगार गजाआड; 4 गुन्हे उघड करून 35 तोळे दागिने हस्तगत

Navi Mumbai Latest Crime News : गुन्हे शाखा कक्ष-3 ची धडाकेबाज कामगिरी; मानखुर्दच्या लल्लुभाई कंपाऊंडमधून आरोपींना ठोकल्या बेड्या

नवी मुंबई | नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Latest Crime News आयुक्तालय क्षेत्रात दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने जबरीने खेचण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. फिर्यादींकडे असलेली मर्यादित माहिती आणि आरोपींचा वेग पाहता हे आव्हान मोठे होते, मात्र तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पनवेल गुन्हे शाखेने या टोळीला जेरबंद केले आहे. Navi Mumbai police latest news

असे अडकले आरोपी जाळ्यात

पनवेल शहर पोलीस ठाण्यात Panvel Police News दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास करत असताना, गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज सखोलपणे तपासले. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना आरोपी मानखुर्द येथील लल्लुभाई कंपाऊंडमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून 28 डिसेंबर 2025 रोजी तीन आरोपींना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेले आरोपी

1.मोहम्मद शफिक हनिफ शाह (वय 28, रा. मानखुर्द)

2.विवेक विश्वनाथ सोनार (वय 25 रा. मानखुर्द)

3.आदर्श हरिसिंग दर्जी (वय 25, रा. मानखुर्द)

100 % मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी या आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्यांनी पनवेल, कामोठे आणि खारघर परिसरात केलेल्या 4 जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी या गुन्ह्यातील चोरीला गेलेले सर्व सोन्याचे दागिने (ज्याची किंमत 9 लाख 93 हजार 500 रुपये आहे) जप्त केले आहेत. आरोपींची 5 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

उघडकीस आलेले गुन्हे

पनवेल शहर पोलीस ठाणे: 2 गुन्हे

कामोठे पोलीस ठाणे:1 गुन्हा

खारघर पोलीस ठाणे: 1 गुन्हा

पोलीस पथकाचे कौतुक

ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन नांद्रे, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, माधव इंगळे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मोठी कारवाई मानली जात आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

39 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago