क्राईम न्यूजमुंबई
Navi Mumbai Crime News : कळंबोलीतून पाच मुले बेपत्ता, तीन सापडले, दोघांचा शोध सुरू आहे.
पनवेल (जितीन शेट्टी) :- कळंबोली पोलीस (kalamboli Police Station) ठाण्याच्या हद्दीतून पाच मुले बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील तीन मुले सापडली आहेत, तर दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. कळंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिडूकपाडा-कातकरवाडी येथील चार मुली आणि एक मुलगा वय 18 वर्षे हे कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. याप्रकरणी सोमवारी कळंबोली पोलिस ठाण्यात तक्रार kalamboli Police दाखल करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलिसांची दोन-तीन पथके तयार करण्यात आली.
ही मुले करंजाडे येथील मामाच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना तेथे तीन मुले सापडली आणि दोन पळून गेले. Navi Mumbai Crime News