मुंबई

Navi Mumbai Crime News : खंडणीखोर महिला वकिलाला न्यायालयीन कोठडी

•नवी मुंबईत हॉटेल मालकाकडून महिलेने वीस लाखाची मागितली होती खंडणी, बारा लाख रुपयांची खंडणी स्वीकारण्याची वकील महिलेने केले कबूल

नवी मुंबई :- सेक्टर 15 सीबीडी बेलापुर येथील हॉटेल प्रणाम फाईन डायनिंगचे चालक किशोर रत्नाकर शेटटी, (धंदा – हॉटेल व्यवसाय, राह. से. .31) केरळ हॉउस जवळ, वाशी, नवी मुंबई व त्यांचे हॉटेल व्यवसायीक भागीदार मित्र लक्ष्मी हॉटेल व अश्वीथ बार ॲण्ड रेस्टॉरंटचे मालक अरूण शेटटी, महेश लंच होमचे मालक महेश शेट्टी, आरूष फाईनडायनींग हॉटेलचे मालक मनोहर शेट्टी, निमत्रंण हॉटेलचे मालक अक्षय शेट्टी, कॉर्पोरेट हॉटेलचे मालक सदाशिव शेट्टी यांच्या विरुध्द एका महीलेने हॉटेल मालक हे अवैधरितेने हॉटेल चालवत असुन व अतिरीक्त बांधकाम केले आहे असी नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये लेखी तक्रार दिली होती.

फिर्यादी किशोर शेट्टी व इतर हॉटेल व्यवसायिक हे सदर महिलेच्या सांगण्यावरून 13 मे 2024 रोजी हॉटेल तुंगा वाशी येथे भेटले त्यावेळी वकील महिलेने हॉटेल बेकायदेशीर चालवित असून अतिरिक्त बांधकाम केले असल्याचे माहिती आहे. बेकायदेशीर बांधकामबाबतची माहिती यापुर्वीही मिडीया, मंत्रायल, महानगरपालिका यांच्याकडे दिली आहे. हॉटेलवरील कारवाई टाळण्यासाठी 20 लाख रूपये खंडणीची मागणी केली. त्यानंतर परत 22 मे रोजी हॉटेल व्यवसायीक असे सदर महिलेच्या सांगण्यावरून तुंगा हॉटेल वाशी येथे भेटले असता महिला व तिचा साथीदार यांनी तडजोड अंती 12 लाख रूपये खंडणीची घेण्याचे मान्य केले होते.

त्याअनुषंगाने सापळा कारवाई दरम्यान दि. 29 मे 2024 रोजी 2.40 वा. सुमारास हॉटेल तुंगा (कॅफेविहार) वाशी येथे खंडणी रक्कम स्विकारणे कामी सदर महीला ही आली असत खंडणी स्वरूपात स्विकारत असताना मध्यवर्ती गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांचे पथकाने सदर वकील महीलेस रंगेहात पकडले. त्यानंतर नमुद आरोपी महीला व तिचा साथीदार यांचेवर वाशी पोलीस ठाणे गुन्हा भादवि कलम 384,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महीलेस अटक करण्यात आली असून पुढील तपास आदेशाने मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा करीत आहे.

पोलीस आयुक्त, नवी मुंबई मिलिंद भांरबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ विटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, सतिश भोसले, महिला पोलीस हवालदार उर्मिला बोराडे, पोलीस हवालदार शशिकांत शेंडगे, पोलीस शिपाई अशोक पाईकराव यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0