Navi Mumbai Crime News : व्हीपीएनचा वापर करून 2 कोटींची खंडणी; नवी मुंबईतील विकासकाला जीवे मारण्याची धमकी

Navi Mumbai Vashi Latest Crime News : वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल; सायबर तपासाला सुरुवात
नवी मुंबई | देशात सायबर गुन्हेगारीचे Cyber Crime प्रमाण झपाट्याने वाढत असतानाच, नवी मुंबईतील प्रतिष्ठित विकासकाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) चा वापर करून अज्ञात व्यक्तीने थेट विकासकाच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. Navi Mumbai Latest Crime News
ही घटना 13 जुलै रोजी घडली. अज्ञात इसमाने समाजमाध्यमांवरून व्हॉइस कॉल आणि मजकूर संदेश पाठवून, “तुझ्या पत्नी, मुलगा आणि भावाला गोळ्या घालून ठार करीन” अशी धमकी दिली. त्यासाठी दोन दिवसांत दोन कोटी रुपये खंडणी देण्याची मागणी करण्यात आली होती. हिंदी भाषेत दिलेली ही धमकी अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने संबंधित विकासकाने तातडीने वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
खंडणीखोराने कॉल करण्यासाठी VPN प्रणालीचा वापर केल्यामुळे, फोन कुठून आला हे शोधणे पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरत आहे. सध्या सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने याचा तपास सुरू आहे. संबंधित व्यक्तीविरोधात खंडणी, धमकी, तसेच टेलिकम्युनिकेशन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे जानेवारी 2025 मध्ये सानपाडा येथे कचरा कंत्राट प्रकरणात झालेल्या गोळीबाराची आठवण ताजी झाली आहे. त्या वेळी आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं होतं. त्यानंतर काही काळ अशा प्रकारचे गुन्हे थांबले होते. मात्र पुन्हा एकदा खंडणी देण्यास नकार दिल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने नवी मुंबईत व्यावसायिक वर्तुळात भीतीचं वातावरण आहे.


