क्राईम न्यूज

Navi Mumbai Crime News : सिगारेटची उधारी मागितल्याने ग्राहक चिडला; पान टपरी चालक आणि बार मालकाला मारहाण

Navi Mumbai Latest Crime News : नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीमध्ये घटना, आरोपी फरार; पोलिसांकडून शोध सुरू

नवी मुंबई :- सिगारेटची उधारी मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ग्राहकाने पान टपरी चालक आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शेजारच्या बार मालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरात घडली आहे. या हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून, आरोपी फरार आहे. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात Turbhe MIDC Police गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Navi Mumbai Latest Crime News

साहिल शेख असे आरोपीचे नाव आहे. बुधवारी संध्याकाळी तो बिअर पीत तुर्भे एमआयडीसीमधील इंदिरानगर भागातील विश्वकर्मा पंडित यांच्या पान टपरीवर आला. तो या टपरीचा नियमित ग्राहक आहे. साहिलने सिगारेट मागितल्यावर विश्वकर्मा यांनी त्याला मागील उधारीचे आणि सध्याच्या सिगारेटचे पैसे देण्यास सांगितले.

उधारी मागितल्याने साहिलला प्रचंड राग आला. त्याने विश्वकर्मा यांना अर्वाच्य शिवीगाळ करत “पुन्हा उधारी मागितलीस तर कापून टाकीन,” अशी धमकी दिली. रागाच्या भरात त्याने टपरीच्या काउंटरवर असलेला मोठा अडकित्ता घेऊन विश्वकर्मा यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यामध्ये त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले.

हा प्रकार पाहून शेजारील बार मालक भांडण सोडवण्यासाठी आले. याचा राग आलेल्या साहिलने हातातील बिअरची बाटली त्यांच्या डोक्यात फोडली. त्यानंतर फुटलेल्या बाटलीच्या काचांनी त्याने स्वतःलाही जखमी करून घेतले.

भर रस्त्यावर झालेल्या या घटनेमुळे मोठी गर्दी जमली. गर्दीचा फायदा घेऊन साहिल शेख घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले. विश्वकर्मा पंडित यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी साहिल शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

vivek

Recent Posts