Navi Mumbai Crime News : चैन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी करणारा सराईत आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या ताब्यात
•Chain Snatching, Motorcycle Stealing Gang In Police Custody तब्बल 19 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला नवी मुंबई गुन्हे शाखेकडून जेरबंद ; नवी मुंबई, दिल्ली चैन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरीकरून घातला धुमाकूळ
नवी मुंबई :- चैन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीला बेड्या ठोकण्यास नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.अटक केलेल्या आरोपीवर विविध ठिकाणी तब्बल 19 गुन्हे तर दिल्लीत हि गुन्हे दाखल आहे.चोरट्याविरोधात एका महिलेच्या गळ्यातील 18 ग्रॅम मंगळसूत्र चोरी प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात कलम 309(4),(6), भारतीय न्याय संहिता 392,34 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. आरोपीच्या विरोधात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सीबीडी,खारघर, पनवेल शहर, कळंबोली,नेरुळ, वाशी सानपाडा, आणि कामोठे परिसरात देखील अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहे.
मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त,संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त,दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अमित काळे पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये महिला संबंधिच्या गुन्हयांना प्रतिबंध करणे व रस्त्यावर घडणारे गुन्हे प्राधान्याने उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या.अजयकुमार लांडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मध्यवर्ती कक्ष यांनी त्यांचे कक्षाकडील तपास पथके तयार करून घटनास्थळी भेटी देवून समांतर तपास करुन मोटर सायकल चोरी व चैन स्नॅचिंग उघडकीस आणणे करीता सुमारे एक आठवडा तांत्रिक तपास करुन उलवे परिसरातून आरोपींचे छायाचित्र प्राप्त करून उलवे परिसरातील 40 ते 45 सोसायटया व गेस्ट हाउस तपासून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
अटक आरोपींची नावे
1.सागर जुगेश मेहरा, (27 वय वर्षे रा.भागवत राज्य उत्तर प्रदेश)
2.अभय सुनिलकुमार नैन, (वय 29 रा. जि. भागवत राज्य उत्तरप्रदेश)
3.शिखा सागर मेहरा, (27 वय ,रा. टिळकनगर, खयाला फेज ०१, दिल्ली)
4.अनुज विरसींग छारी,( 24 वय रा. से. 19 ए कोपरखैरणे, नवी मुंबई)
7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांचेकडुन नवी मुंबई परिसरात जबरी चोरीचे 07 गुन्हे, वाहन चोरीचे 02 गुन्हे व दिल्ली येथील 1 गुन्हा असे एकुण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.तसेच आरोपी कमांक 1 याचेविरूध्द दिल्ली येथे 37 गुन्हे दाखल असुन 1 गुन्हयात पाहिजे आरोपी आहे व त्याचेविरूध्द न्यायालयाने 4 गुन्हयात जाहिरनामे प्रसिध्द केले आहेत.1 सोन्याचे मंगळसुत्र, 3 सोन्याच्या चैन, 2 तुटलेल्या सोन्याच्या चैनचे तुकडे असे एकुण 66 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 केटीएम मोटार सायकल असा एकुण किंमत 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस पथक
गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे वपोनि, सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलम पवार, पोलीस उपनिरीक्षक राहूल भदाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश वाट, पोलीस हवालदार शशिकांत शेंडगे, महिला पोलीस हवालदार उर्मिला बोराडे, पोलीस हवालदारअनिल यादव, संजय राणे, महेश पाटील, पोलीस नाईक सचिन टिके, निलेश किंद्रे, राहूल वाघ, अजय कदम, महेश अहिरे, सतिश चव्हाण, नितिन परोडवाड यांनी केली आहे.