क्राईम न्यूजठाणेमुंबई

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत घरफोड्यांचा धुमाकूळ! दोन दिवसांत 31 लाखांचा ऐवज लंपास

Navi Mumbai Latest Robbery News : नेरुळमध्ये तीन मोठ्या घरफोडीच्या घटना; दागिने, रोकडसह मंदिरातील समईची चोरी

नवी मुंबई :– नवी मुंबईतील नेरुळ भागात गेल्या दोन दिवसांत तीन मोठ्या घरफोड्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल 31 लाख 37 हजार 600 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरीला गेलेल्या सामानामध्ये सोन्याचे दागिने, रोकड आणि एका मंदिरातील मौल्यवान समईचा समावेश आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Navi Mumbai Robbery News

तीन घरफोडीच्या घटना

1.गुरव यांच्या घरात चोरी:
नेरुळ सेक्टर 15 येथे राहणारे सुशील गुरव आपल्या कुटुंबासह भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी गेले होते. घरी परत आल्यावर त्यांना दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला आढळला. घरात पाहणी केली असता,4 लाख 57 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने, दोन घड्याळे आणि 20 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. ही घटना 13 ते 14 सप्टेंबरदरम्यान घडली असून, नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2.मंदिरातून समई लंपास:
नेरुळ सेक्टर 5 येथील एसआयईएस महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या अंजनीया मंदिरात चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिरातून दोन फूट उंचीची, 3 लाख 90 हजार रुपये किमतीची पितळी समई चोरून नेली. ही घटना नोव्हेंबर 2024 ते जून 2025 दरम्यान घडली, मात्र सामानाची पाहणी करताना हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3.भोईर यांच्या घरात मोठी चोरी:
नेरुळमधील शिरवणे येथे राहणाऱ्या मिलिंद भोईर यांच्या घरातही चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्यांच्या आईच्या खोलीतील कपाटातून 22 लाख 90 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये 85 तोळ्यांचा हार, दोन सोनसाखळ्या आणि तीन जोडी कानातील डुल यांचा समावेश आहे. ही चोरी 20 ते 30 ऑगस्टदरम्यान घडली असून, रविवारी याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या तिन्ही घटनांमध्ये एकूण 31 लाख 37 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे. मात्र, शहरात एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0