क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Navi Mumbai Crime : 17 दिवसांत सायबर फसवणुकीचा पर्दाफाश! नवी मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी

Navi Mumbai Crime : डायरेक्टर असल्याचं भासवत बँक खात्यातून उडवले 75 लाख; पोलिसांनी केली काटेकोर तपासणी

नवी मुंबई : फसवणुकीच्या प्रकरणात सायबर पोलिसांनी Navi Mumbai Cyber Fraud अवघ्या 17 दिवसांत मोठा यश मिळवत तब्बल 75 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. फसवणूक करून पैसे काढणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला यश आलं आहे. Navi Mumbai Latest News

75 लाखांची ऑनलाईन फसवणूक उघडकीस, दोन आरोपी मालवणी परिसरातून अटकेत

18 ते 19 मे 2028 दरम्यान, आरोपींनी तक्रारदाराच्या कंपनीत डायरेक्टर असल्याचे भासवून त्याच्या बँक खात्यातून ऑनलाईन 75 लाख रुपये हस्तगत केले होते. यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास पथकाने सखोल तांत्रिक विश्लेषण केले. या तपासात मालवणी, मुंबईतील बँकेतून रक्कम काढल्याचे निष्पन्न झाल्यावर, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शाबाज अरीफ अन्सारी (वय 30 ) आणि बिलकिस नसीम मोमीन उर्फ बिको (वय 49) यांना अटक केली.

दोघांनाही 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सायबर पोलिसांकडून सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे सायबर गुन्ह्यांविरोधातील पोलिसांच्या दक्षतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.

Milind Bharambe, police commissioner,
Milind Bharambe, police commissioner,

ही कारवाई मिलींद भारंबे पोलीस आयुक्त, संजय येनपुरे सह पोलीस आयुक्त, दीपक साकोरे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अमित काळे पोलीस उप आयुक्त (गुन्हे) आणि भाऊसाहेब ढोले सहाय्यक पोलीस आयुक्त, आ.गु.शा./सायबर यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर, पोलीस हवालदार विजय आयरे, संदेश गुजर, पोलीस शिपाई भाऊसाहेब फटांगरे, पोलीस शिपाई नितेश म्हात्रे, महिला पोलीस शिपाई पुनम गडगे (नवी मुंबई) यांनी उघडकीस आणला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0