Navi Mumbai Crime Branch : नवी मुंबई क्राईम ब्रांच अॅक्शनमोडवर;बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई
Navi Mumbai Crime Branch Take Action On Illegal Bangladeshi Migrant : बेकायदेशीर रित्या वास्तव्यास असणाऱ्या नवी मुंबई येथील बांग्लादेशी नागरिकांविरोधात गुन्हे शाखेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईच्या तुर्भे परिसरातून तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतली असून तर एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार महिला बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे
नवी मुंबई :- दिल्लीत बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता मुंबई आणि ठाण्यात जोरदार कारवाई सुरु झाली आहे. Navi Mumbai Illegal Bangladeshi Migrant आता नवी मुंबईतही पोलिसांनी बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीय नागरिकांना धर पकडची मोहीम हाती घेतली आहे. Navi Mumbai Crime Branch कोणतीही कागदपत्रे नसताना महाराष्ट्रात राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहे. नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईच्या विविध भागात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरू आहे. गुन्हे शाखेकडून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकाने नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.तुर्भे येथील एमआयडीसी परिसरातून येथून तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एक पुरुष व दोन महिला आहेत. तुर्भे पोलीस ठाण्यात बांगलादेशी नागरिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणू लुफर सरदार (46 वय), शर्मिलाबिवी सत्तार शेख, (34 वय),सिददीक अकबर सरदार, (वय 32) यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्यांच्याविरुद्ध तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून न्यायालयासोबत हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
तसेच वाशीच्या एपीएमसी परिसरात पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी 4 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.फातीमा बरकत शेख (वय 25) वाशी, नवी मुंबई तिच्या सोबत तिचा मुलगा रेहान बरकत शेख, (वय-6) अल्पना बोरहन शेख, (वय-28) सपना किसनदेव पांग्डे उर्फ मोमिना रोबीयो खातुन (35 वय) नैनु इस्राईल शेख (40 वय ) यांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस पथक
दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्त, (AHTU), गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे, पोलीस हवालदार मांडोळे, पोलीस शिपाई ठाकुर, चव्हाण, पारासुर, महिला पोलीस हवालदार धोणसेकर, महिला पोलीस नाईक अडकमोल,भोये, पोलीस हवालदार हांडे यांनी केलेली आहे