
Mumbai Bandra Latest Crime News : वांद्र्यातून फेसबुकवर चाईल्ड पोर्नोग्राफी अपलोड; दोघांविरोधात गुन्हा दाखल
मुंबई | फेसबुकसारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलींच्या अश्लील चित्रफिती प्रसारित करण्याच्या धक्कादायक प्रकारात आता मुंबईतील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Crime News 2022 मध्ये उत्तराखंडच्या नैनिताल येथे उघडकीस आलेल्या या प्रकरणात, संबंधित काही क्लिप्स मुंबईतील वांद्रे येथून अपलोड केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खेरवाडी पोलिसांनी Khetwadi Police तातडीने कारवाई करत गुन्हा नोंदवला. Mumbai Latest Crime News
50 बाल अश्लील चित्रफितींचा विकृत व्यवहार
तपासात उघड झाल्यानुसार, अल्पवयीन मुलींना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या सुमारे 50 अश्लील चित्रफिती फेसबुकवर अपलोड करण्यात आल्या होत्या. या गंभीर प्रकरणाचा मुख्य गुन्हा नैनिताल पोलीस ठाण्यात दाखल झाला होता आणि त्याचा तपास गेल्या तीन वर्षांपासून सुरू होता. तांत्रिक तपासाच्या माध्यमातून अखेर महिपाल महरा (20, रा.नैनिताल) आणि आकाशकुमार गुप्ता (25,रा. जौनपूर) यांची ओळख पटवण्यात आली.
मोबाईल लोकेशन ट्रॅकिंगद्वारे काही व्हिडीओ वांद्रे पूर्व येथून अपलोड केल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, 9 डिसेंबर 2022 रोजी रात्री, हे व्हिडीओ महिपाल महरा याच्या फेसबुक खात्यावरून पोस्ट करण्यात आले होते. त्यामुळे खेरवाडी पोलिसांनी बीएनसच्या कलम 67 (ब) नुसार दोघांविरोधात बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सामग्रीच्या प्रसाराचा गुन्हा दाखल केला आहे.


