मुंबई

Navi Mumbai CIDCO : सिडकोच्या अनधिकृत तोडफोड कारवाईला महाविकास आघाडीने केला विरोध ; कारवाई थांबवली

पनवेल : कळंबोली येथील 30 ते 40 वर्षापूर्वीची घरे अनधिकृत ठरवून त्यांच्यावर तोडफोडीची कारवाई करण्यात आलेल्या सिडकोच्या Navi Mumbai CIDCO अतिक्रमण विभागाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आडवे होवून ही कारवाई थांबविल्याने ग्रामस्थांनी महाविकास आघाडीचे Navi Mumbai Aghadi आभार मानले आहेत. Navi Mumbai CIDCO Latest News

आज कळंबोली येथील प्रकल्प ग्रस्ताची 35/40 वर्षा पूर्वीची घरे अनाधिकृत ठरवून त्या घरांवर अचानक कारवाई करण्यासाठी सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी पोलिस फौज फाटयासह आले असताना महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, मा.आ. बाळाराम पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, मा.नगरसेवक गोपाळ भगत, सरस्वतीताई काथारा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली शहरप्रमुख सुर्यकांत म्हसकर, ज्योती मोहिते, अरविंद कडव ,अनंता भगत , दिपक पाटील, रजनीश पंडित व ग्रामस्थ बहुसंखेने उपस्थित राहुन तीव्र विरोध करून सिडकोस कारवाई थांबवणेस भाग पाडले. Navi Mumbai CIDCO Latest News

यासाठी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांसह महाविकास आघाडीच्या रेट्यापुढे सिडकोचे अतिक्रमण विभाग नमले व त्यांनी आज करण्यात येणारी कारवाई थांबविली आहे. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त Navi Mumbai Police ठेवण्यात आला होता. Navi Mumbai CIDCO Latest News

Web Title : Navi Mumbai CIDCO: Mahavikas Aghadi opposes unauthorized demolition of CIDCO; Action stopped

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0