•२०२० पासून सुरू होता फसवणुकीचा प्रकार; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नवी मुंबई :- कमी वेळेत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून नवी मुंबईतील ऐरोली येथे एका चिटफंड कंपनीने तब्बल 36 जणांची 1 कोटी 48 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, फसवणूक झालेल्यांची संख्या आणि रक्कम वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
असा झाला घोटाळा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया पवार उर्फ सुप्रिया मेहेर, सागर मेहेर, सुभाष पवार, प्रशांत पवार, नीतिम पवार आणि तृप्ती पवार यांनी एकत्र येऊन 2020 पासून ही चिटफंड कंपनी सुरू केली होती. त्यांनी गुंतवणूकदारांना 45 दिवसांत 9 ते 12 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. जाहिरातींना बळी पडून अनेक लोकांनी त्यात गुंतवणूक केली.
सुरुवातीला कमीत कमी 50 हजार रुपयांची गुंतवणूक करण्याचे सांगण्यात आले. या फसवणुकीत 36 जणांनी प्रत्येकी 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवली असून, एकूण फसवणुकीची रक्कम 1 कोटी 48 लाख 50 हजार 960 रुपये इतकी आहे.
गुन्हा दाखल आणि तपास सुरू
रोहन कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणात सोमवारी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याने, ज्या नागरिकांनी या कंपनीत गुंतवणूक केली असेल, त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद भोसले हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. गुंतवणूकदारांनी नेहमीच अशा आकर्षक योजनांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…