क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Navi Mumbai Call Center Busted : नवी मुंबईत कोट्यवधींचे ‘कॉल सेंटर’ रॅकेट उद्ध्वस्त! अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 20 आरोपींना अटक

Navi Mumbai Police Busted Call Center : शेअर्स ट्रेडिंग, अमेरिकन नागरिकांच्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस अटॅक! 12 कोटी 29 लाखांचे व्यवहार उघड

नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तालयातील बोगस कॉल सेंटरचा शोध घेण्याच्या आदेशानंतर, सायबर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेने तुर्भे येथील मिलेनियम पार्क येथे मोठी संयुक्त कारवाई केली आहे. शेअर्स मार्केट ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष दाखवून भारतीय नागरिकांची, तसेच अमेरिकेतील नागरिकांच्या संगणकामध्ये व्हायरस अटॅक करून फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. Navi Mumbai International Call Center Fraud News

मिलेनियम पार्क, बिल्डींग नं 03, तिसरा माळा, सेक्टर 03, तुर्भे याठिकाणी ‘The Wealt Growth’, ‘The Capital Services’, ‘Sigma’, ‘Trade Knowledge Services’ आणि ‘Stock Vision’ या नावांनी कॉल सेंटर सुरू होते. 18 नोव्हेंबर 2025 रोजी केलेल्या छापा कारवाईत 97 मुले आणि मुली संगणकावर व्हॉट्सॲप ग्रुपवर चॅटिंग तसेच कॉलवर बोलताना आढळले. Navi Mumbai Latest Crime News

फसवणुकीची पद्धत

कॉल सेंटरमधून नागरिकांना शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवले जात होते. जप्त केलेल्या 71 बँक खात्यांचे ट्रान्झॅक्शन तपासले असता, 61 खात्यांमध्ये एकूण 12 कोटी 29 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. तसेच, मध्यरात्री 6.30 ते पहाटे 3.30 वाजेदरम्यान ‘IT Mac world Solution’ या कंपनीमार्फत अमेरिकेतील नागरिकांच्या संगणकांमध्ये Ramsomware/Malware Attack केला जात होता. कॉम्प्युटरवर ‘Microsoft Error Code’ दाखवून याच कॉल सेंटरचा VOIP नंबर मायक्रोसॉफ्ट सपोर्ट नंबर म्हणून दिला जात होता. कॉल सेंटरमधील कर्मचारी मायक्रोसॉफ्ट सपोर्ट सेंटरमध्ये काम करत असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांकडून समस्या सोडवण्याच्या नावाखाली पैसे उकळत फसवणूक करत होते.

पोलिसांनी कॉल सेंटरमधून पुराव्याच्या दृष्टीने 38 मोबाईल फोन, 21 सीपीयू, 5 लॅपटॉप, 5 एसएसडी आणि 1 जीएसएम सर्वर जप्त केला आहे. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे, ज्यांना दि. 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0