क्राईम न्यूज

Navi Mumbai Bribe News : शासकीय सर्व्हेसाठी 2 लाखांची लाच मागितली; पहिला हप्ता घेताना अधिकारी गजाआड!

Land Records Clerk Caught Red-Handed Taking Bribe : नवी मुंबईतील ‘नैना’ प्रकल्पात जमीन मोजणीसाठी लाच मागणी

नवी मुंबई :- सरळसोट सरकारी प्रक्रिया पार पाडण्यासाठीसुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात रक्कम गेली पाहिजे, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या एका शासकीय कर्मचाऱ्याला अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. Land Records Clerk Caught Red-Handed Taking Bribe नवी मुंबईतील नैना प्रकल्पातील जमीन मोजणीसाठी 2 लाखांची लाच मागणाऱ्या आणि 50 हजार चा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या शिरस्तेदाराला अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचून गजाआड केले. ACB Arrested Bribe Person

आरोपी संजीपान प्रभाकर सानप (वय 44) हे सिडकोच्या नैना प्रकल्पात कार्यरत असलेल्या भुमी अभिलेख कार्यालयात शिरस्तेदार म्हणून कार्यरत होते. तक्रारदाराच्या मित्राच्या जमिनीची आकारफोड व मोजणी प्रक्रिया लवकर व्हावी, यासाठी त्यांनी एकूण दोन लाख लाचेची मागणी केली होती.

50 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचखोर शिरस्तेदार ACB च्या जाळ्यात सापडला

4 जून रोजी ACB नवी मुंबईकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार 5 जून रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली आणि तक्रारीप्रमाणे आरोपीने रक्कम मागितल्याचे स्पष्ट झाले.

6 जून 2025 रोजी पोलिस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. आरोपी सानप यांनी तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्यावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई शिवराज पाटील (पोलीस अधीक्षक, ACB ठाणे), संजय गोवीलकर व सुहास शिंदे (अपर पोलीस अधीक्षक, ACB ठाणे परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक धर्मराज सोनके यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या नेतृत्वाखाली केली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago