मुंबई

Navi Mumbai Breaking News : मृत मुलीच्या शवासाठी ‘लाच’; वाशीतील मनपा रुग्णालयात संतापजनक प्रकार

Navi Mumbai Latest Bribe Case : शव ताब्यात देण्यासाठी 2 हजारांची मागणी

नवी मुंबई | वाशीतील मनपा संचलित प्रथम संदर्भ रुग्णालयात मानवी संवेदना पुन्हा एकदा पायदळी तुडवली गेली आहेत. Bribe Demanded For Body Cloth आपल्या मुलीच्या मृतदेहासाठी आलेल्या दुःखी पालकांकडून शव ताब्यात घेण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच मागितल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. Navi Mumbai Breaking News

22 वर्षीय तरुणीचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मनपा रुग्णालयात नेण्यात आला होता.शवविच्छेदनानंतर मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. आज तिचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोहोचले असता, तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने 2 हजार रुपयांची लाच थेट मागितली. अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या कुटुंबीयांनी ही रक्कम देऊन मृतदेह ताब्यात घेतला.

ही घटना मनसेच्या वाशी विभाग अध्यक्ष सागर विचारे यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णालय प्रशासकाच्या दालनात धडक देत निषेध आंदोलन छेडले. कर्मचाऱ्यांच्या अनैतिक वागणुकीचा निषेध नोंदवत त्यांनी शवावर टाकले जाणारे श्वेत कापड प्रशासनाच्या तोंडावर फेकले.

या प्रकाराबाबत विचारणा केली असता, रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पाटील यांनी हा प्रकार घडल्याची कबुली दिली. “संबंधित कर्मचाऱ्याचा वर्तन निंदनीय असून त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात आले आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts