Navi Mumbai Bank Loan Scam : ॲक्सीस बँकेच्या लोनव्दारे 14 लाखांची फसवणूक!
•Fraud of 14 Lakhs through Axis Bank Loan नवी मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई, फसवणुकीतील आरोपी गजाआड, तीन फरार आरोपींचा शोध
नवी मुंबई :- नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी दिल्ली येथून बँकेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका सराईत टोळीच्या गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र पोलिसांना हवा असलेल्या सायबर गुन्हेगारांच्या आंतरराष्ट्रीय टोळीतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपीचे नाव आशिक अली उर्फ आरिफ (32 वय) असे असून त्याने नवी मुंबईच्या कळंबोली येथे राहणाऱ्या एकाच 26 वर्षीय तरुणीची तब्बल 14 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पोलिसांनी आरोपी आरिफ याला अटक केली असून पोलिसांकडून त्याच्या तीन साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना ॲक्सीस बँकेतुन फोन केल्याचे भासवुन तसेच फिर्यादी यांचे व्हॉटसअपरवर ॲक्सीस बँक अधिकाऱ्याचे बनावट आयडी कार्ड पाठवुन फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीचे नेट बँकींग हॅक करून फिर्यादीचे खात्यात ॲक्सीस बँकेचे एकुण 14 लाखांचे पर्सनल लोन घेउन नंतर लोन डिॲक्टीवेट करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांचे खात्यात जमा झालेली 14 लाखांची रक्कम इतर खात्यात वळवुन फिर्यादी यांची फसवणुक केली म्हणुन कळंबोली पोलीस ठाणे येथे भादवि 467,468,420,170,34 भादवि सह 66 (क) 66 (ड) आयटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयाचा पुढील तपास पनवेल सायबर सेल करत आहेत.
सायबर सेल, पनवेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली पाटील व पथकाने गुन्हयातील बँक व्यवहार विश्लेषण आणि क्लिष्ट तांत्रिक विश्लेषण केले असता सदर गुन्हयातील संशयित आरोपीत टोळी ही दिल्ली येथुन ॲक्सीस बँक पर्सनल लोन फॉड करीत असल्याचे निष्पन्न झाले. तरी आरोपींबाबत अधिक तपास करता गुन्हयातील एक आरोपी नामे आशिक अली उर्फ आरिफ अल्लानुर उर्फ पप्पु खान, (32 वय) यांस दिल्ली येथुन सापळा रचुन शिताफिने अटक करण्यात आली. गुन्हयात आणखी 3 आरोपी असुन फरार आरोपींचा शोध चालु आहे.
पोलीस पथक
मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नवी मुंबई, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2, अशोक राजपुत, सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र यमगर, पोलीस हवालदार वैभव शिंदे, रमेश वैद्य, पोलीस नाईक दादा माने, पोलीस शिपाई नितीन जावरे, प्रगती म्हात्रे,दिपक चौधरी हे सहभागी होते.