नवी मुंबई : रिक्षा व दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक,17 गुन्ह्यांची उकल
Navi Mumbai Police Arrested Criminal : आरोपीने सीबीडी, खारघर, कळंबोली, उलवे, वाशी, पनवेल शहर तसेच मुंबईतील नेहरूनगर, घाटकोपर पंतनगर,बांद्रा आणि खार या परिसरात वाहने चोरी केल्याची कबुली दिली आहे
नवी मुंबई :- – रिक्षा व दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात नवी मुंबई पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 च्या Navi Mumbai Unit 1 अंतर्गत येणाऱ्या सीबीडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे CBD Police Station प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपींकडून 17 गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे.आरोपीने सीबीडी, खारघर, कळंबोली, उलवे, वाशी, पनवेल शहर तसेच मुंबईतील नेहरूनगर, घाटकोपर पंतनगर,बांद्रा आणि खार या परिसरात वाहने चोरी केल्याची कबुली दिली आहे
सिबीडी पोलीस ठाणे, नवी मुंबई भारतीय न्याय संहिता कलम 303(2) या गुन्हयातील फिर्यादी यांची ॲक्टीव्हा स्कूटी 5 जानेवारी रोजी आयकर कॉलनी, सेक्टर 21/22, सीबीडी बेलापूर येथून चोरी झाली होती. सीबीडी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्ह्यातील चोरी झालेल्या वाहनांच्या आरोपींचा शोध घेत असताना दिवसरात्र अथक परिश्रम घेवून घटनास्थळ व आजूबाजूचे परिसरातील सुमारे 50 ते 55 सीसीटीव्ही कॅमे-याची पाहणी करत 02 संशयित आरोपी निष्पन्न केले आहे.अशरफ आलम शेख (21 वय) आणि रमजान अब्दुलमतीन शेख उर्फ पापा (22 वय) दोन्ही आरोपी नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूरच्या सेक्टर-10 परिसरातील टाटानगर येथे राहणारे आहे. पोलिसांनी आरोपींकडून 12 ऑटो रिक्षा आणि मोटरसायकल हस्तगत केले आहे. असा एकूण 20 लाख 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला आहे. आरोपी अशरफ आलम शेख सायन आणि गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस पथक
मिलिंद भारंबे पोलीस आयुक्त नवी मुंबई, संजय येनपूरे पोलीस सह आयुक्त नवी मुंबई, दिपक साकोरे अप्पर पोलीस आयुक्त नवी मुंबई, पंकज डहाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ-01 वाशी, मयूर भुजबळ, सहाय्यक पोलीस आयुक्त तुर्भे विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली संदेश रेवले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिबीडी पोलीस ठाणे,अरूण पवार पोलीस निरीक्षक गुन्हे,यांचे देखरेखीत सिबीडी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश डांबरे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघ, पोलीस हवालदार पाटील, पठाण, भोकरे, चव्हाण, पोलीस नाईक बंडगर, वाघ, साबळे, पोलीस शिपाई पाटील,
पाटील यांनी केली आहे.