Mumbai Crime News : ठाणे क्राइम ब्रांचची जबरदस्त कारवाई; अंधेरी परिसरातून वांटेड आरोपी अटक

अंधेरी परिसरातून वांटेड आरोपी दिनेश शिवगणला अटकेत!आरोपीला अंधेरी येथील सिटी मॉल जवळून अटक
मुंबई (अंधेरी) :- ठाणे शहरातील क्राइम ब्रांचच्या (AHTC) विशेष टीमने अंधेरी वेस्ट येथील सिटी मॉलच्या आसपासून कोपरी पोलीस स्टेशनच्या पीटा एक्ट अंतर्गत वांटेड असलेल्या दिनेश शिवगण या आरोपीला यशस्वीपणे अटक केली आहे. दिनेश शिवगण हा आरोपी भारतीय दंडसंहितेच्या कलम 143(1), 3(5) आणि पीटा एक्ट 4,5 अंतर्गत गुन्ह्याच्या संशयात होता आणि त्याच्याविरोधात पोलिसांनी सखोल तपास सुरू केला होता.
ठाणे शहरातील या मोठ्या कारवाईत AHTC च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, पोलीस उपनिरीक्षक डी. व्ही. चव्हाण, पोलीस हवालदार विजय पाटील, राजेश सुवारे, महिला पोलीस हर्षिता थोरात यांसह संपूर्ण ठाणे क्राइम ब्रांचने संयुक्तपणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे ठाणे पोलिसांच्या गुन्हेगारी प्रतिबंधासाठी केलेल्या प्रयत्नांना मोठा हातभार लागला आहे.
ठाणे शहरातील या धक्कादायक कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढेल अशी अपेक्षा आहे. आरोपी दिनेश शिवगण याला अटक करून पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा मोठा टप्पा गाठला आहे. कोपरी पोलीस स्टेशनच्या तपासयंत्रणेखाली पुढील तपास सुरु असून आरोपीविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.


