Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाच्या सुरक्षेसाठी ‘अभेद्य’ ढाल! आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्याला अखेर शासकीय मान्यता; 108 पदांची निर्मिती

Navi Mumbai Police News : गृह विभागाचा महत्त्वाचा निर्णय; पनवेल शहर आणि उलवा पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र विभाजित करून स्वतंत्र ठाणे उभारणार ; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या पाठपुराव्याला यश

नवी मुंबई :- देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे Navi Mumbai International Police Station स्थापन करण्यास औपचारिक मान्यता दिली आहे. यासाठी 108 नियमित पदे निर्माण करण्यासही शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. Navi Mumbai Police Latest News

राज्य शासनाने सोमवारी (ता. 6) जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, विद्यमान पनवेल शहर आणि उलवा पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र विभाजित करून हे स्वतंत्र पोलीस ठाणे उभारले जाणार आहे.

सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा अत्यावश्यक

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर दरवर्षी 9 कोटी प्रवासी आणि 360 कोटी मेट्रिक टन मालवाहतूक हाताळणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील वाहतूक आणि वाढत्या गर्दीसाठी तसेच शेजारील उलवा नोडमधील वाढत्या लोकसंख्येसाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आवश्यक होते. आयुक्तांच्या या प्रयत्नांना आता यश आले आहे.

108 पदांची रचना

या नवीन पोलीस ठाण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या 108 पदांमध्ये दोन पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक, सहा उपनिरीक्षक, सहा सहायक उपनिरीक्षक, 27 हवालदार, 42 पोलीस शिपाई, 19 महिला शिपाई आणि तीन चालक पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.

तसेच, या पदांवरील आस्थापना खर्चासाठी 3 कोटी 38 लाख आणि इमारतीमधील वाहन व इतर साहित्यासाठी 1 कोटी 76 लाखांच्या खर्चाच्या तरतुदीलाही शासनाने मंजुरी दिली आहे.

कामकाजाचे नियोजन

नवी मुंबई पोलीस दलाचे उपायुक्त (मुख्यालय प्रशासन) संजयकुमार पाटील यांनी माहिती दिली की, सध्या विमानतळ क्षेत्रातील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम सुरू आहे. “विमानतळावरून प्रत्यक्षात उड्डाण सुरू होईपर्यंत उर्वरित पदनिर्मितीला सुद्धा मंजुरी मिळेल आणि पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू करण्याचे नियोजन आहे,” असे ते म्हणाले.

नवीन पोलीस ठाणे उभारल्यामुळे विमानतळ परिसरात कायदा व सुव्यवस्था, प्रवासी सुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

14 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

14 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

19 hours ago