Navi Mumbai Murder News : अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले ; पैशाच्या वादातून मित्राने दगडाने ठेचून खून केला.खुनाचा गुन्हा दाखल करुन मित्राला अटक केली.
नवी मुंबई :– पैशाच्या वादातून मित्राने मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटनेचा नवी मुंबईच्या गुन्हे शाखा कक्ष-3, Navi Mumbai Crime Branch 2 24 तासात उलगडले आहे. खारघर हिल परिसरात डोंगरांमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले आहे. मित्राला तीस हजार रुपये उसने दिले असता ते परत न दिल्याने हाच राग मनात धरून दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. कमल नथुराम ढोलपुरीया, (वय 36 रा. चेंबूर मुंबई मूळ राहणार -जिल्हा नागोर, राज्य राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. Navi Mumbai Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,1 नोव्हेंबरच्या दरम्यान भारती विद्यापीठ जवळील खारघर हील परिसरात डोंगरामध्ये एक अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले होते. त्याबाबत खारघर पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यु , भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 194 अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली होती. प्राथमिक चौकशीमध्ये मयत व्यक्तीचा दगडाने ठेवून मारण्यात आल्याचे दिसून आले होते. नवी मुंबई पोलिसांच्या कक्ष-03, गुन्हे शाखेकडून तात्काळ घटनास्थळी भेट देवून मयत व्यक्तीचे ओळख पटविण्याकरिता तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील येण्या-जाण्याचे मार्गाबाबत तांत्रिक तपास व गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे अत्यंत कौशल्यपुर्ण व सखोल पद्धतीने चौकशी केली असता मृत व्यक्ती हा एका व्यक्तीसोबत फिरताना आढळून आल्याने त्याबाबत कक्षाकडून चौकशी सुरु होती.अनोळखी मृत व्यक्तीबाबत केलेल्या तपासामध्ये कमल नथुराम ढोलपुरीया, हा मयत व्यक्तीसोबत फिरत असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपासा व्दारे कमल यांचा शोध घेतला असता तो नेहरूनगर, मुंबई येथे मिळून आला. त्यास पुढील चौकशीकरीता ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे प्रकरणाबाबत सखोल चौकशी केली असता, विकास रामलाल बोरा याने सहा महिन्यापुर्वी त्याचेकडून घेतलेले 30 हजार रुपये परत केले नसल्याचा राग मनात धरुन दगडाने ठेवून त्याचा खून केल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये सांगितले आहे. Navi Mumbai Latest Crime News
खारघर पोलीस ठाण्यात Kharghar Police Station आरोपीच्या विरोधात कलम 103,238 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी 2 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली असुन, 8 नोव्हेंबर पर्यंत आरोपीची पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे. गुन्हयाचा पुढील आधिक तपास खारघर पोलीस ठाणे करीत आहे. आरोपीवर यापूर्वीच नेहरू नगर पोलीस ठाण्यात कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. Navi Mumbai Latest Crime News
पोलीस पथक
मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नवी मुंबई यांच्या आदेश व सुचनांप्रमाणे अमित काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे तसेच अजयकुमार लाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलानी व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ देसाई,पोलीस उपनिरीक्षक आकाश पाटील तसेच पोलीस हवालदार सावंत, सुधीर पाटील, राजकुमार दुधाळ, पोलीस नाईक राजेश मोरे यांनी गुन्हयाचे तपासकामी महत्त्वपुर्ण कामगिरी करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.