मुंबई

Rohit Pawar Tweet : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट

भाजपच्या सभेला पैसे देऊन रोजंदारीने माणसे……….. Rohit Pawar Tweet

मुंबई :- भाजपच्या सभेला पैसे देऊन रोजंदारीने माणसे बोलावली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी केला आहे. याच दरम्यान एक व्हिडीओ देखील त्यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून पोस्ट केला आहे. सगळीकडे कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप, अशी टीका देखील आमदार रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान, त्यांच्या या व्हिडिओची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

सभेला पैसे देऊन माणसं आणावे लागतात रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट Rohit Pawar करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, “सगळीकडे कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप… यांना सभेला पैसे देऊन रोजाने माणसं आणावे लागतात हे आता जगजाहीर आहे, पण या गरीब माणसांच्या पैशातूनही हे कसं कमिशन खातात ते या व्हिडिओत बघा..”, अशा कॅप्शनसह रोहित पवारांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडीओ सध्या Rohit Pawar सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिलांचा एक गट रस्त्यावरून जात असताना दोन दुचाकीस्वार त्यांना अडवून विचारतात अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा Rohit Pawar यांच्या सभेसाठी तुम्ही आला होता ना? यावर महिलाही होय असे उत्तर देत यासाठी आम्हाला प्रत्येकी 300 रुपयेच दिल्याचे सांगतात. मात्र दुचाकीस्वार संबंधित व्यक्तीने 700 रुपये उचलल्याचा दावा करतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून राजकीय नेते मोठमोठ्या सभा घेत आहेत. बडे नेते नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अशातच भाजपकडून सभांना गर्दी जमवण्यासाठी नागरिकांना विविध प्रलोभने दाखवली जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यातच आता हा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0