मुंबई
Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक मतदार संघात दुपारी तीन वाजेपर्यंत तर 64.41 टक्के मतदान…
Nashik Teacher Constituency Latest Update : कोकण पदवीधर मतदार संघ; जिल्ह्यात 1 वाजेपर्यंत 15.78 टक्के मतदान
मुंबई :- विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक Teacher’s Constituency Election पार पडणार आहे. यामध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघांचा समावेश आहे. मुंबई, कोकणमध्ये पदवीधर मतदारसंघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडणार आहे. या जागांसाठी आज मतदान होणार आहे तर 1 जुलै रोजी मतमोजणी होईल. लोकसभेप्रमाणे या निवडणुकीतही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे.महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक आहे.
दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 39% झाले मतदान
- कोकण पदवीधर मतदारसंघ 35.65%
- मुंबई पदवीधर मतदारसंघ 38.39%
- मुंबई शिक्षक मतदारसंघ 40.48%
- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ 43.47%