•”शिवसेना तीच, नेता नवा” — गावित यांचे शब्द; महायुतीच्या बळावर शिंदेंचा निवडणूक रणसंग्रामासाठी इशारा
नाशिक :- राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (यूबीटी) ला आज मोठा झटका बसला, कारण इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हात धरला. यासोबत नाशिकमधील एक हजारांहून अधिक महिला कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश केला असून, नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
या पक्षप्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. गावित यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “नेतृत्व बदलेलं आहे, पण आमची शिवसेना तीच आहे. मी पुन्हा लोकसेवेसाठी सज्ज आहे.”
एकनाथ शिंदे यांनी यावेळी नव्या कार्यकर्त्यांचं स्वागत करताना म्हटलं, “ही फक्त सुरुवात आहे. महायुती सरकारवर लोकांचा विश्वास आहे आणि ही लाट लवकरच नगरपालिका निवडणुकीत विजयी ठरेल.” त्यांनी पुढे सांगितले की सर्व कार्यकर्त्यांनी लगेच प्रचारासाठी सज्ज व्हावं.
मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये लवकरच महापालिका निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर गावित यांचा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विशेष म्हणजे, निर्मला गावित या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांची कन्या असून, त्यांनी काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात केली होती.
2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता शिंदे गटात त्यांचा पुनर्प्रवेश महायुतीसाठी बळकटी देणारा ठरणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
ठाकरे गटासाठी ही घटना केवळ एक नेत्याचा नाही, तर मजबूत कार्यकर्त्यांचा गट गमावल्याची गंभीर नोंद ठरणार आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…