Nashik Tapovan Tree Cutting News : पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध डावलून प्रशासनाची वृक्षतोड सुरू; अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज ठाकरेंना भेटून मांडला मुद्दा; शेतकऱ्यांचा टीडीआरला विरोध कायम
नाशिक :- 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिकच्या तपोवन परिसरात सुरू असलेल्या विकासकामांनी आता नवा वाद निर्माण केला आहे. नवीन एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया) प्लांटसाठी आजपासून (11 डिसेंबर) 300 हून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली आहे, ज्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कुंभमेळ्यासाठी साधुग्राम बांधण्याची योजना असून, त्यासाठी तपोवनमधील जवळपास 1800 झाडे तोडावी लागणार आहेत.पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध असूनही सरकारने आजपासून वृक्षतोड सुरू केली आहे. एसटीपी प्लांटसाठी झाडांची कत्तल केल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे, तर महापालिका प्रशासनाने 447 झाडे तोडण्याची रीतसर परवानगी असल्याचा दावा केला आहे.
प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी तपोवनला भेट देऊन या वृक्षतोडीला विरोध दर्शवला असून, त्यांनी या मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेऊन चर्चा केली आहे.
तपोवन परिसरात उभारला जाणारा नवीन एसटीपी प्लांट आणि साधुग्रामसाठी भूसंपादनाचा मुद्दाही वादात आहे. शेतकऱ्यांनी टीडीआर (TDR) द्वारे भूसंपादनास ठाम विरोध दर्शवला असून, बाजारभावानुसार फक्त रोखीने मोबदला देण्याची त्यांची मागणी आहे. महापालिकेचा 50 टक्के टीडीआर आणि 50 टक्के रोख रक्कमेचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावला आहे. महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी वाटाघाटींचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, वृक्षतोडीची भरपाई करण्यासाठी हैदराबादवरून नाशिकसाठी आज 15,000 झाडे आणली जात आहेत. ही रोपे पेलिकन पार्क आणि गंगापूर रोड व्यतिरिक्त गोदावरी, नंदिनी, कपिला नद्यांच्या तीरावर देखील लावण्याच्या जागांचा शोध सुरू आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…