Raj And Uddhav Thackeray : ‘दोन भाऊ, दोन पक्ष एकत्र आले आहेत’, आगामी काळात राज्यात संयुक्त कार्यक्रमांचे संकेत
नाशिक :- मुंबईतील मराठी भाषा मेळाव्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Uddhav Thackeray आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महाराष्ट्राच्या राजकारणात नवे पर्व सुरू केले आहे. मुंबईनंतर आता नाशिकमध्ये या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले आहेत. नाशिकमधील गुन्हेगारी, अमली पदार्थ आणि खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी आज, शुक्रवारी दोन्ही पक्षांनी संयुक्त मोर्चा काढला. Maharashtra Breaking News
या मोर्चात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रमुख भूमिका मांडली. दोन्ही नेत्यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली.
‘नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले, याचे उत्तर नाशिकमध्ये मिळेल’ – खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात ‘नेपाळ’मधील परिस्थितीचा संदर्भ दिला, ज्यावरून आधीच राजकीय वादंग सुरू आहे. ते म्हणाले, “जनतेचा आक्रोश रस्त्यावर उतरतो तेव्हा नेपाळ होते, बांगलादेश होते. हा इशारा देण्यासाठीच नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे.” त्यांनी शिंदे गटावर हल्ला चढवत, “माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्ही पोलीस आयुक्तांना भेटलात. तुम्हाला वाटतं महाराष्ट्राचा नेपाळ होईल. पण, नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले, याचे उत्तर नाशिकमध्ये मिळेल,” असे म्हटले.
भाजपवर गंभीर आरोप
राऊत यांनी पंचवटीतील राहुल धोत्रे हत्याकांडाचा उल्लेख करत भाजपवर गंभीर आरोप केले. या हत्या प्रकरणातील संशयित भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे अद्याप फरार आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, “राहुलची हत्या देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्याने, गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्याने केली आहे. जर भाजपचा एक नगरसेवक हत्या करून फरार होतो आणि त्याला कोण वाचवत आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांना माहीत नसेल, तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात.”
नांदगावकरांनी साधला निशाणा
यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले, “आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते एकत्र आले आहेत. सन्माननीय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र उतरले तर तुमचे काय होईल याचा विचार तुम्हीच करा.” त्यांनी नाशिकच्या विकासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि नाशिककरांचा विश्वासघात झाल्याचे म्हटले.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…